India vs England 1st Test Live : पावसानं पुन्हा वाट लावली; इंग्लंडच्या बचावासाठी टीम इंडियासमोर अडचण निर्माण केली!

India vs England 1st Test Live Cricket Score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाऊस पुन्हा एकदा यजमानांच्या मदतीला धावून आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:52 PM2021-08-06T22:52:46+5:302021-08-06T22:53:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Live : Rain forces early stumps on Day 3 as England reach 25/0 in 2nd innings, trail India (278) by 70 runs   | India vs England 1st Test Live : पावसानं पुन्हा वाट लावली; इंग्लंडच्या बचावासाठी टीम इंडियासमोर अडचण निर्माण केली!

India vs England 1st Test Live : पावसानं पुन्हा वाट लावली; इंग्लंडच्या बचावासाठी टीम इंडियासमोर अडचण निर्माण केली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st Test Live Cricket Score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीत पाऊस पुन्हा एकदा यजमानांच्या मदतीला धावून आला. पहिल्या दिवशी इंग्लंडचा खेळ १८३ धावांवर गडगडल्यानंतर दुसऱ्या दिवसाला लोकेश राहुल फॉर्मात असताना पावसानं खोडा घातला अन् खेळ थांबवावा लागला. तिसऱ्या दिवशीही टीम इंडियानं ९५ धावांची आघाडी घेत इंग्लंडवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री झाली अन् खेळ थांबवावा लागला. India vs England 1st Test Live Score 

इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला!

रोहित शर्मा व लोकेश यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, जेम्स अँडरसनच्या एका षटकानं टीम इंडियाच्या गोटात भीतीचा गोळा टाकला. विराट ( ०), पुजारा ( ४) आणि रहाणे ( ५) झटपट माघारी परतले. लोकेशने पाचव्या विकेटसाठी रिषभ पंतसह ३३ धावा जोडल्या, परंतु ऑली रॉबिन्सननं रिषभला ( २५) बाद केले. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेशला बाद करून अँडरसननं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशनं २१४ चेंडूंत १२ चौकारांसह ८४ धावा केल्या. त्यानंतर जडेजानं फटकेबाजी केली. त्यानं ८६ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. 

जडेजा-मोहम्मद शमी जोडीनं २७ आणि शमी-जसप्रीत बुमराह जोडीनं १३ धावांची भागीदारी केली. जसप्रीतनं फटकेबाजी करताना ३ चौकार व १ षटकारासह  २८ धावा केल्या. भारतानं पहिल्या डावात २७८ धावा करत ९५ धावांची आघाडी घेतली.   ऑली रॉबिन्सननं ( ५/८५) पाच आणि जेम्स अँडरसननं ( ४/५४) चार विकेट्स घेतल्या.  इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबाद २५ धावा केल्या असून अजूनही ते ७० धावांनी पिछाडीवर आहेत. Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score

 

Web Title: India vs England 1st Test Live : Rain forces early stumps on Day 3 as England reach 25/0 in 2nd innings, trail India (278) by 70 runs  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.