India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची फटकेबाजी दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहे आणि त्याला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याचीही दमदार साथ मिळत आहे. रूटनं १५० धावांचा पल्ला पार केला, तर स्टोक्सनंही अर्धशतक झळकावून भारतासमोर मोठे आव्हान ठेवण्याच्या दिशेनं खेळ सुरू केला आहे. भारतीय गोलंदाज ही जोडी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्यांना साजेशी साथ मिळताना दिसत नाही. त्यात विराट कोहली ( Virat Kohli) आणि DRS यांच्यातील ३६ चा आकडा याही सामन्यात दिसला. अवघ्या १५ मिनिटांत विराटनं दोन DRS गमावले, तर स्टोक्सचे दोन झेलही सुटले. माझं नाव वॉशिंग्टन...; यष्टिंमागून रिषभ पंतची सुरू होती बडबड, BCCI पोस्ट केला भन्नाट Video
खेळपट्टीवर जम बसलेल्या रूटनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. त्यावर स्टोक्स धावांचे इमले रचत आहे. आर अश्विन, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा यांना दुसऱ्या दिवशीही विकेटसाठी संघर्ष करावा लागला. दुसऱ्या दिवसाच्या १०८व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर स्टोक्स पायचीत असल्याची अपील झाली. विराटनं लगेच DRS घेतला, परंतु रिप्लेमध्ये चेंडू पॅडऐवजी स्टोक्सच्या ग्लोजला लागल्याचे दिसले आणि भारतानं हा रिव्ह्यू गमावला. Non-stop Cricket : टीम इंडियाचे पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक जाहीर; बघा कोणाकोणाला भिडणार!