India vs England, 1st Test : ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video 

India vs England, 1st Test : इंग्लंडला दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 8, 2021 12:21 PM2021-02-08T12:21:03+5:302021-02-08T12:21:26+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test : R Ashwin is the first spinner in over 100 years to take a wicket off the first ball of an innings | India vs England, 1st Test : ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video 

India vs England, 1st Test : ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test Day 4 : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिल्या डावात ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन ( R Ashwin) वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करावी लागली. टीम इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्यांना दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नव्या चेंडूवर पहिले षटक आर अश्विनच्या हाती सोपवलं आणि त्यानं १०० वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवला. २० वर्षांनतर टीम इंडियाच्या बाबतीत घडली 'ही' अजब घटना; तुम्हालाही वाटेल आश्चर्य

आर अश्विननं ( R Ashwin) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ( Rory Burns) याला बाद केलं. अजिंक्य रहाणेनं स्लीपमध्ये झेल टिपला आणि विराट नाचू लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर गेल्या ११४ वर्षांत फिरकी गोलंदाजाला विकेट घेता आली नव्हती. आर अश्विननं हा विक्रम करून दाखवला. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर आज अश्विननं हा मान पटकावला.  चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 

पाहा तो ऐतिहासिक क्षण..

मॅच हायलाईट्स

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.  

- रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या.  चेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतला. पुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली. पण, ही जोडी माघारी परतल्यानंतर टीम इंडिया पुन्हा संकटात सापडली. 

 

- ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर व आर अश्विन या जोडीनं इंग्लडच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी ८० धावांची भागीदारी केली आणि सुंदरनं खणखणीत अर्धशतक झळकावले. ICC Poll : विराट कोहलीला धक्का; पाकिस्तानचा बाबर आझम ठरला 'Cover Drive King'!

-  वॉशिंगटननं सलग दोन कसोटी सामन्यांत अर्धशतक झळकावलं. त्याची फटकेबाजी पाहून सर्वच अवाक् झाले... ड्रेसिंग रुममध्ये बसलेला कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही कौतुक करताना दिसले. 

 

Web Title: India vs England, 1st Test : R Ashwin is the first spinner in over 100 years to take a wicket off the first ball of an innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.