India vs England, 1st Test : रोहित शर्मानं केलं पुन्हा निराश; गोलंदाजांच्या यशानंतर आता फलंदाजांची जबाबदारी 

India vs England, 1st Test : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडनं पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेऊनही टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला

By स्वदेश घाणेकर | Published: February 8, 2021 05:08 PM2021-02-08T17:08:57+5:302021-02-08T17:19:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test : Stumps on Day 4 , India 39 for 1 wkt, final day India need 381 and England need 9 wickets | India vs England, 1st Test : रोहित शर्मानं केलं पुन्हा निराश; गोलंदाजांच्या यशानंतर आता फलंदाजांची जबाबदारी 

India vs England, 1st Test : रोहित शर्मानं केलं पुन्हा निराश; गोलंदाजांच्या यशानंतर आता फलंदाजांची जबाबदारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे४२० धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा १२ धावांवर माघारीशुबमन गिल व चेतेश्वर पुजारा लढवतायेत खिंडआर अश्विननं दुसऱ्या डावात घेतल्या ६ विकेट्स

India vs England, 1st Test Day 4 : हिटमॅन रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या डावातही अपयशी ठरल्यानं टीम इंडियाची चिंता वाढली आहे. इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेल्या ४२० धावांचा पाठलाग करताना भारताला २५ धावांवर पहिला धक्का दिला. रोहित ( १२) माघारी परतल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. तत्पूर्वी आऱ अश्विननं ६ विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. खेळपट्टीचा कल आता पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूनं झुकल्यानं सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार हे निश्चित आहे. चौथ्या दिवसअखेर भारतानं १ बाद ३९ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी त्यांना ३८१ धावांची गरज आहे. रक्तानं कपडे माखले, बोटाचं हाड बाहेर आलं अन् असह्य वेदना; तरीही त्यानं केली गोलंदाजी!

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडनं पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेऊनही टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून रिषफ तंत ( ९१), वॉशिंग्टन सुंदर ( ८५*) आणि चेतेश्वर पुजारा ( ७३) यांनी उल्लेखनीय खेळ केला. इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्यांना दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नव्या चेंडूवर पहिले षटक आर अश्विनच्या हाती सोपवलं आणि त्यानं १०० वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवला.   


अश्विनचा हा धमाका सुरूच होता आणि त्याला इशांत शर्माची साथ मिळाली. इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळच केला. पहिल्या डावातील द्विशतकवीर जो रूट यानंही ३२ चेंडूंत ७ चौकारांसह ४० धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं त्याची विकेट घेतली. दरम्यान इशांत शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये ३०० वी विकेट घेतली. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो सहावा आणि तिसरा जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे ( ६१९), कपिल देव ( ४३४), हरभजन सिंग ( ४१७), आर अश्विन ( ३८२), झहीर खान ( ३११) यांनी हा पल्ला पार केला.  ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video 


इंग्लंडनं आजच्या सामन्यात तोही पल्ला सर केला. आर अश्विननं ६१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. भारतीय गोलंदाजानं पहिल्या कसोटीत एकूण २७ नो बॉल फेकले. पहिल्या डावात २० ( इशांत शर्मा ५, जसप्रीत बुमराह ७ व शाहबाज नदीम ६) आणि दुसऱ्या डावात ७ ( बुमराह १, अश्विन व नदीम ३) असे नो बॉल टाकले. २० वर्षांनतर टीम इंडियाच्या बाबतीत घडली 'ही' अजब घटना; तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Image

Web Title: India vs England, 1st Test : Stumps on Day 4 , India 39 for 1 wkt, final day India need 381 and England need 9 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.