India vs England, 1st Test Day 4 : हिटमॅन रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या डावातही अपयशी ठरल्यानं टीम इंडियाची चिंता वाढली आहे. इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेल्या ४२० धावांचा पाठलाग करताना भारताला २५ धावांवर पहिला धक्का दिला. रोहित ( १२) माघारी परतल्यामुळे चाहते निराश झाले आहेत. तत्पूर्वी आऱ अश्विननं ६ विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. खेळपट्टीचा कल आता पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूनं झुकल्यानं सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार हे निश्चित आहे. चौथ्या दिवसअखेर भारतानं १ बाद ३९ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी त्यांना ३८१ धावांची गरज आहे. रक्तानं कपडे माखले, बोटाचं हाड बाहेर आलं अन् असह्य वेदना; तरीही त्यानं केली गोलंदाजी!
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडनं पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेऊनही टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून रिषफ तंत ( ९१), वॉशिंग्टन सुंदर ( ८५*) आणि चेतेश्वर पुजारा ( ७३) यांनी उल्लेखनीय खेळ केला. इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, त्यांना दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) नव्या चेंडूवर पहिले षटक आर अश्विनच्या हाती सोपवलं आणि त्यानं १०० वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवला.