Join us  

India vs England, 1st Test: २० वर्षांनतर टीम इंडियाच्या बाबतीत घडली 'ही' अजब घटना; तुम्हालाही वाटेल आश्चर्य

India vs England, 1st Test : रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल हे आघाडीचे फलंदाज फार काही करू न शकल्यानंतर टीम इंडियाचं काही खरं नव्हतं. पण,

By स्वदेश घाणेकर | Published: February 08, 2021 11:54 AM

Open in App
ठळक मुद्देवॉशिंग्टन १३८ चेंडूंत १२ चौकार व २ षटकार मारून ८५ धावांवर नाबाद राहिलाडॉम बेसनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन विकेट्स

India vs England, 1st Test Day 4: इंग्लंडनं पहिल्या डावात उभा केलेला ५७८ धावांचा डोंगर सर करताना टीम इंडियाची दमछाक झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल हे आघाडीचे फलंदाज फार काही करू न शकल्यानंतर टीम इंडियाचं काही खरं नव्हतं. पण, रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. पुजारा दुदैवी रित्या माघारी परतला, पण रिषभची फटकेबाजी सुरूच होती. रिषभचं शतक पुन्हा हुकलं आणि तो ९१ धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टनं सुंदरची झुंज; टीम इंडियाला फॉलोऑन न देण्याचा इंग्लंडचा निर्णय

वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी अनपेक्षित कामगिरी करून दाखवली. घरच्या मैदानावर खेळताना या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी ८० धावांची भागीदारी केली. अश्विन ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन दमदार फटकेबाजी करू लागला. त्याच्या आक्रमक खेळीनं सर्वांना अवाक् केलं. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन त्यानं मारलेला षटकार थक्क करणारा होता. आर अश्विन ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक खेळ केला. पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. वॉशिंग्टन १३८ चेंडूंत १२ चौकार व २ षटकार मारून ८५ धावांवर नाबाद राहिला.

डॉम बेसनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. भारताला पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करावी लागली. ५ बाद १९२ वरून टीम इंडियानं मारलेली मजल नक्की कौतुकास्पद आहे. Video : पाकिस्तानी फलंदाज धावला 'मांजरी'च्या मागे; सहकारी म्हणाला, अज्जू भाई ती बायो बबलमध्ये नाहीय!

या सामन्यात भारताचे दहाच्या दहा फलंदाज झेलबाद झाले. यापूर्वी १९८८मध्ये हैदराबाद कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध आणि २००१मध्ये मुंबई कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध  भारताचे सर्व फलंदाज पहिल्या डावात झेलबाद होऊन माघारी परतले होते.

  पाहा सर्व विकेट्स...

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ