Join us  

India vs England 1st Test Live : पावसानं विजय हिस्कावून घेतला अन् विराट कोहली भडकला, म्हणाला ही तर लाजिरवाणी बाब!

India vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड कंपनीच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसामुळे हिरावला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 9:17 PM

Open in App

India vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड कंपनीच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसामुळे हिरावला गेला. भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी १५७ धावाच करायच्या होत्या अन् ९ फलंदाज हाताशी होते. लोकेश राहुल बाद झाला असला तरी अखेरच्या दिवशी १५७ धावा करणे टीम इंडियासाठी सहज शक्य होते. पण, भारताला अखेरीस अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले अन् जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना ४-४ असे समान गुण मिळाले. पावसाच्या या खेळीवर कॅप्टन विराट भडकला.  India vs England 1st Test Live, India vs England 1st Test

भारतीय संघानं यजमान इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळला. जसप्रीत बुमराहनं चार आणि मोहम्मद शमीनं दोन विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ६४ धावा करून एकटा भिडला. प्रत्युत्तरात भारताकडून लोकेश राहुल ( ८४) व रवींद्र जडेजा ( ५६) यांनी अर्धशतकी खेळी करताना २७८ धावा करताना संघाला ९५ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सननं ५ आणि जेम्स अँडरसननं ४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही रूटनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं अन् १०९ धावा कुटल्या. त्याच्या शतकानं इंग्लंडला ३०३ धावांपर्यंत पोहोचवलं आणि भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतानं १ बाद ५२ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर पावसाचा खेळ सुरूच राहिला. जो रूटला सामनावीर म्हणून जाहीर केले गेले. Ind vs Eng 1st Test live, Eng vs ind 1st test live score

या निकालानंतर विराट कोहली म्हणाला,''तिसऱ्या व चौथ्या दिवशी पाऊस पडेल हे अपेक्षित होते आणि त्यानं पाचव्या दिवसाची निवड केली. जेव्हा आम्ही विजयाच्या समीप येणार होतो. आम्हाला दमदार सुरुवात करायची होती आणि पाचव्या दिवशी विजय मिळवण्याची संधी आहे, असे आम्हाला वाटत होते. आम्ही टॉपवर आहोत असेच वाटत होते, परंतु पाचव्या दिवशी खेळता आले नाही, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.'' Eng vs Ind 1st test live score board

''चौथ्या दिवशी आम्ही ५० धावा केल्या आणि त्यामुळे संघात सकारात्मकता आली. संघातील टेलएंडरनेही चांगला खेळ केला. त्यांनी नेट्समध्ये कसून मेहनत घेतली आणि त्यामुळेच पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेता आली. त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यामुळे पुढील सामन्यातही ४-१ या कॉम्बिनेशननेच उतरण्याची शक्यता अधिक आहे,''असेही तो म्हणाला.  Ind vs End 1st test match live

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीजो रूट
Open in App