एडबॅस्टन - संकटमोचक विराट कोहलीने भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत बॅकफूटवर जाण्यापासून वाचवले. त्याने इंग्लंड दौऱ्यातील अपयशावर मात करताना १४९ धावा चोपल्या आणि टीकाकारांना गप्प केले. इंग्लंडमधील पहिले कसोटी शतक विराटने पत्नी अनुष्का शर्माला समर्पित केले आहे. विराटने २२५ चेंडूत १४९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. या शतकानंतर त्याने असे काही केले की लाखो चाहत्यांची मने जिंकली.
विराटला एक जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने संयमी खेळ करताना तळाच्या फलंदाजांना सोबत घेत संघाला २७४ धावांपर्यंत मजल मारून दिली. ज्या विराटला २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात दहा डावांत १३.४० च्या सरासरीने केवळ १३४ धावाच करता आल्या होत्या, त्याच विराटने पहिल्याच कसोटीत आपला दम दाखवला.
बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चौकार लगावत विराटने शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आपल्या नेहमीच्या अंदाजात बॅट उंचावली.. पण त्यापुढे त्याने जे केले ते पाहून चाहते पुन्हा त्याच्या प्रेमात पडले.. पाहा हा व्हिडिओ..