बर्मिंगहम : मैदानात आपल्या आक्रमकपणामुळे विराट कोहलीकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही कोहलीकडून अशीच एक चुक झाली घडली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ होण्यापूर्वी त्याला सामनाधिकारी जेफ क्रो यांनी तंबी दिली असल्याची गोष्ट निदर्शनास आली आहे.
काय होते प्रकरणसामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूट दमदार फलंदाजी करत होता. रुट आता शतक झळकावणार असे वाटत होते. पण कोहलीने त्याला 80 धावांवर धावचीत केले. यावेळी कोहलीने एक शिवी हासडली आणि रुटला फ्लाइंग किसही दिला. ही गोष्ट सामनाधिकारी क्रो यांना रुचली नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ होण्यापूर्वी क्रो भारताच्या पेव्हेलियनमध्ये आले आणि त्यांनी कोहलीला तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.