Join us  

India vs England, 1st Test : सोपा झेल सोडला अन् फलंदाजीतही अपयशी ठरला; रोहित शर्माला इंग्लंडच्या खेळाडूनं दिली  'ही' ऑफर!

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 07, 2021 11:14 AM

Open in App
ठळक मुद्दे५७८ धावांचा पाठलाग करताना भारताचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी रोहितच्या हातून सुटलेला झेल पाहून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानंही आश्चर्य व्यक्त केलं.

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुट ( Joe Root) च्या २१८ धावा, डॉम सिब्ली ( ८७) व बेन स्टोक्स ( ८२) यांची अर्धशतकी खेळी आणि रोरी बर्न्स ( ३३), ऑली पोप ( ३४), जोस बटलर ( ३०) व डॉम बेस ( ३४) यांच्या योगदानाच्या जोरावर इंग्लंडनं ही मोठी मजल मारली.  इंग्लंडच्या संघानं १९०.१ षटकं खेळली. यापूर्वी २००९मध्ये भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत २०२.४ षटकं फेकावी लागली होती. चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराश केलेच, शिवाय क्षेत्ररक्षणातही ढिसाळ कामगिरी केली. विराट कोहली ( Virat Kohli) आणि DRS यांच्यातील छत्तीसचा आकडा याही सामन्यात कायम दिसला. विराटनं घेतलेले तीनही DRS वाया गेले आणि त्यामुळेच जोस बटलर झेलबाद असूनही केवळ पंचांनी नाबाद दिल्यानं तो भारतीय गोलंदाजांची धुलाई करत राहिला. त्यात भर म्हणून भारतीय खेळाडूंनी चार झेल सोडले. यष्टिरक्षक रिषभ पंतनं एक झेल, एक रन आऊट आणि एक स्टम्पिंग सोडून इंग्लंडला मदतच केली. रोहित शर्मानंही सोपा झेल सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या हातून हा सुटलेला झेल पाहून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानंही आश्चर्य व्यक्त केलं.  जड़ से उखाड़ देंगे Root ko! अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफचे भन्नाट उत्तर

त्यात फलंदाजीतही रोहित अपयशी ठरला. रोहित या सामन्यात त्रिशतक झळकावेल, असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan ) यानं केला होता. त्याच वॉननं रोहितला त्याच्या फिल्डिंग अकादमीत दाखल होण्याची ऑफर दिली.  दरम्यान, रोहित शर्मा ( ६) चौथ्याच षटकात जोफ्रा आर्चरच्या उसळी घेतलेल्या चेंडूवर यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आर्चनं टीम इंडियाला दुसरा धक्का देताना शुबमन गिलला ( २९) माघारी पाठवले. भारताचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी परतले. आर अश्विननं आशियात केला पराक्रम; ५५.१ षटकं फेकून नोंदवला भारी विक्रम

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माबेन स्टोक्स