India vs England, 1st Test Day 5 : १ बाद ३९ धावसंख्येवरून पाचव्या दिवशी पराभव टाळण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची हालत खराब झाली आहे. रोहित शर्माचा त्रिफळा उडवणाऱ्या जॅक लीचनं सकाळच्या सत्रात चेतेश्वर पुजाराला माघारी पाठवून टीम इंडियाला धक्का दिलाच होता. त्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. शुबमन गिल दुसऱ्या बाजून इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांची धुलाई करू लागला. विराटला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं चेंडू जेम्स अँडरसन ( james Anderson) ला बोलावलं आणि त्यानं त्याची कामगिरी चोख बजावली. थर्ड अम्पायरची बारीक नजर अन् टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम!
- पहिला चेंडू निर्धाव
- दुसऱ्या चेंडूवर अर्धशतकवीर शुबमन गिलचा उडवला त्रिफळा
- तिसऱ्या चेंडू निर्धाव
- चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेसाठी DRS.. मैदानावरील पंचांचा नाबाद निर्णय तिसऱ्या पंचांनी राखला कायम
- पाचव्या चेंडूवर अनप्लेअबल चेंडूवर अजिंक्य रहाणेचा उडाला त्रिफळा ( भारताची अवस्था ४ बाद ९२ धावा)
- पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियाची घरच्या मैदानावर अशी अवस्था होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. भारताला पराभव टाळण्यासाठी आता पाचव्या दिवशी संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंडच्या ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा पहिला डाव ३३७ धावांवर गडगडला.
- २४१ धावांची आघाडी घेऊन इंग्लंडचा संघ पुन्हा मैदानावर उतरला. पण, यावेळी आर अश्विननं ६ विकेट्स घेत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पहिल्या डावातील द्विशतकवीर कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ४० धावा केल्या. इंग्लंडचा डाव १७८ धावांवर गडगडला. पण, तरीही भारतासमोर ४२० धावांचं तगडं आव्हान उभं राहिलं.
- रोहित शर्मा व शुबमन गिल ही जोडी चांगली फटकेबाजी करताना दिसली. परंतु जॅक लीचनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहित १५ धावांवर माघारी परतला. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियानं १ बाद ३९ धावा केल्या होत्या.
- जेम्स अँडरसननं सर्वाधिक ४ वेळा अजिंक्य रहाणेला शून्यावर माघारी पाठवले. यानंतर वीरेंद्र सेहवाग ( ३) व मुरली विजय ( ३) यांचा क्रमांक येतो.
पाहा व्हिडीओ...