Join us  

India vs England 3rd Test : सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा पोहोचला हॉस्पिटलमध्ये, पोस्ट केलेल्या फोटोने वाढवली चिंता!

India vs England 3rd Test : लिड्स कसोटीत इंग्लंडनं एक डाव व ७६ धावांनी टीम इंडियावर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:15 PM

Open in App

India vs England 3rd Test : लिड्स कसोटीत इंग्लंडनं एक डाव व ७६ धावांनी टीम इंडियावर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळून इंग्लंडनं ४३२ धावा करताना ३५४ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा दुसरा डाव २७८ धावांवर गडगडला अन् इंग्लंडनं बाजी मारली. चौथ्या दिवशी १०० मिनिटांत भारताचे ८ फलंदाज अवघ्या ६३ धावांवर माघारी परतले. आता चौथी कसोटी २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्यात संघात काही बदल होणार असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीनं दिले आहेत. पण, लिड्स कसोटीचा निकाल लागल्यानंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यानं हॉस्पिटल गाठले. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीतून ही गोष्ट समोर आली अन् आता चाहत्यांची चिंता वाढली आहे. ( Jadeja hurt his leg while fielding and taken for scans) 

CPL 2021 : ड्वेन ब्राव्हो पाकिस्तानी फलंदाजाशी असं काही वागला की होतेय सर्वत्र चर्चा, Video

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटीत टीम इंडियानं संघात फार बदल केले नाही. त्यात आर अश्विननं अंतिम ११मध्ये खेळायला हवे असे सर्वांचे मत असताना कर्णधार कोहली रवींद्र जडेजावर ठाम राहिला. जडेजाला तीन सामन्यांत १३३ धावा आणि फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सराव करताना रवींद्र जडेजाचा पाय दुखावला होता आणि काही काळासाठी त्यानं मैदान सोडले होते. तिसऱ्या कसोटीत जडेजानं २५ चेंडूंत ३० धावा केल्या. सामना संपल्यानंतर जडेजा त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे स्कॅन करण्यासाठी गेला होता. त्यानं हा फोटो पोस्ट केला. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप BCCIनं सांगितलं नाही. ( Ravindra Jadeja Undergoes Scans to Know Extent of Knee Injury)

लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर टांगती तलवार, विराट कोहली घेणार मोठा निर्णय!

इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला. कर्णधार जो रूटनं सलग तिसरं शतक झळकावून टीम इंडियाचा बॅक सिटवर ढकलले.  भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात संघर्ष दाखवला. रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला. पुजारा व कर्णधार विराट कोहली या जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लवढून दिलासादायक कामगिरी केली. चौथ्या दिवशी पुजाराला एकही धावेची भर न घातला ९१ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर विराटही ५५ धावांवर बाद झाला अन् २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर गडगडला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजा
Open in App