भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संघ श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर २-०असे लोळवून भारतात दाखल झाला आहे. भारतीय संघानंही ऑस्ट्रेलियात ऐतिहासिका २-१ असा मालिका विजय मिळवला आहे. त्यात या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात विराट कोहली, लोकेश राहुल, इशांत शर्मा हे प्रमुख खेळाडू परतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाची बाजू अजून मजबूत झाली आहे. पहिल्या कसोटीच्या आदल्या दिवशी इंग्लंडला मोठा धक्का बसला. चेंजिंग रुमबाहेर घसरून पडल्यानं त्यांच्या सलामीवीराला दुखापत झाली आणि त्यानं पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे. शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या पॉप स्टार रिहानाचा क्रिकेटशी असलेला संबंध तुम्हाला माहिती आहे का?
इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅवली ( Zak Crawley) यानं पहिल्या दोन कसोटीमधून माघार घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ही माहिती दिली आहे. २३ वर्षीय खेळाडूच्या उजव्या मनगटाला दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली. ''बुधवारी स्कॅन करण्यात आले आणि त्यात झॅकला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे. ड्रेसिंग रुमबाहेरील मार्बल फ्लोअरवर त्याचा पाय घसरला आणि ही दुखापत झाली,''असे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका
इंग्लंड - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, जेम्स ब्रॅसी, मेसोन क्रॅन, साकिद महमूद, मॅट पर्किसन, ऑली रॉबीन्सन, अमर विर्दी.