Rohit Sharma Angry on DJ : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटक वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय नोंदवला. भारतीय संघाच्या या विजयात कर्णधार रोहित शर्मानं सिंहाचा वाटा उचलला. त्याने धमाकेदार अंदाजात शतकी खेळी साकारली. त्याची तुफान खेळी मॅचनंतरही चर्चेत आहे. त्यात आता रोहित शर्माच्या एका खास व्हिडिओची भर पडली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात 'डीजे वाले बाबू'मुळे रोहित शर्माचा पारा चढल्याचा सीन पाहायला मिळाला. त्याने डीजेचा आवाज वाढल्यावर रोहित जाम चिढला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् रोहित शर्मा डीजे वाल्यावर भडकला
कटक येथील बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात फ्लडलाइटचा खेळ पाहायला मिळाला. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर दोन वेळा बत्तीगुल झाल्यामुळे सामना थांबवण्याची वेळ आली. क्रिकेटच्या मैदानात सामना थांबला की, फलंदाजाचे लक्षविचलित होते. इंग्लंडच्या ३०० पार धावसंख्येचा पाठलाग करताना हा प्रकार घडल्यामुळे रोहित-शुबमन जोडीसमोर पुन्हा नव्याने सेट होण्याचे चॅलेंज उभे राहिले होते. दोघांनी शतकी भागीदारी करत फ्लडलाइट खेळानंतर प्रकाशझोतात आणणारी खेळी केली. पण दरम्यान रोहित शर्मा डीजेवाल्यावर भडकल्याचा सीनही दिसून आला.
हिटमॅनमध्ये दिसला अँग्रीमॅनचा अवतार
आधीच फ्लडलाइटच्या खेळातून सावरताना फलंदाजांवर पुन्हा लक्षकेंद्रीत करण्याची कसोटी निर्माण झाली होती. त्यात डीजे वाल्यानं आवाज वाढवला. ही गोष्ट रोहित शर्माला खटकली. त्याने डीजे ऑपरेटवर नाराजी व्यक्त केली. थेट त्याने बंद करा, ते अशी हावभाव करत अँग्रीमॅनची झलक दाखवून दिली. हिटशोच्या चर्चेनंतर आता त्याचा अँग्रीमॅनचा अवतार दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
कटकच्या मैदानात रोहित शर्मानं ठोकली कडक सेंच्युरी
कटकच्या मैदानात रोहित शर्मानं ९० चेंडूत ११९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. शुबमन गिलसोबत शतकी भागीदारी करत भारतीय कर्णधाराने इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. वनडेत वर्षभराहून अधिक काळांनी त्याच्या भात्यातून शतक आले.