रोहितची 'फिफ्टी'; मैदानात उतरताच खास क्लबमध्ये मारली एन्ट्री

३७ वर्षीय रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तो आठवा खेळाडू ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:24 IST2025-02-09T15:23:28+5:302025-02-09T15:24:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd ODI Rohit Sharma will captain in his 50th ODI match See Captancy Record | रोहितची 'फिफ्टी'; मैदानात उतरताच खास क्लबमध्ये मारली एन्ट्री

रोहितची 'फिफ्टी'; मैदानात उतरताच खास क्लबमध्ये मारली एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटक येथील बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मैदानात उतरताच हिटमॅन रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी हा ५० वा वनडे सामना आहे. ३७ वर्षीय रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तो आठवा खेळाडू ठरला आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रोहितची खास क्लबमध्ये एन्ट्री

भारतीय संधाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीत सर्वात आघाडीवर आहे. त्याने २०० वनडेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या यादीत धोनीशिवाय मोहम्मद अझरुद्दीन (१७४), सौरव गांगुली (१४६), विराट कोहली (९५), राहुल द्रविड (७९), कपिल देव (७४) आणि सचिन तेंडुलकर (७३) या एलिट यादीत तो सामील झाला आहे.

रोहितचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड

रोहित शर्मानं २०१७ मध्ये पहिल्यांदा ५० षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. कटक सामन्यापूर्वी  त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या नावे ३५ विजयाची नोंद आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ मध्ये आशिया कप स्पर्धा जिंकली होती.  २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने फायनल खेळली होती. 

कॅप्टन्सीत वनडेत २००० हून अधिक धावा 

वनडेत कॅप्टन्सी करताना २००० हून अधिक धावा करणाऱ्यांच्या यादीच रोहित सातवा फलंदाज आहे. कटक सामन्यापूर्वी ५३.८० च्या सरासरीनं त्याच्या खात्यात हजार २०६ धावांची नोंद आहे. पण मागील काही सामन्यांपासून तो सातत्याने अपयशी ठरताना दिसले. खास सामन्यात फ्लॉप शो चा ठपका पूसत तो पुन्हा लयीत येणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: India vs England 2nd ODI Rohit Sharma will captain in his 50th ODI match See Captancy Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.