-
- धोनीच्या 10000 धावा पूर्ण, अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय, 2 यष्टीरक्षक आणि 12 वा फलंदाज ठरला आहे.
- उमेश यादव भोपळा न फोडताच माघारी, भारताच्या 7 बाद 192 धावा
- हार्दिक पांड्या बाद झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ
- रैनालाही अर्धशतकाने हुलकावणी दिली
- मोईन अलीने कोहलीला केले पायचीत
- विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या अर्धशतकी भागिदारीने भारताला सावरले
- भारताच्या 15 षटकांत 3 बाद 87 धावा
- लोकेश राहुल आऊट, भारताला तिसरा धक्का
- भारताच्या 10 षटकांत 2 बाद 57 धावा
- भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 15 धावांवर त्रिफळाचीत
मजबूत 'रूट'मुळे इंग्लंड भक्कम, भारताला 323 धावांचे आव्हान
लंडन - लॉर्ड्स येथील दुस-या वन डे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. पुन्हा एकदा कुलदीप यादवच्या फिरकीसमोर त्यांना गिरकी आली. सलामीचे हे दोन्ही फलंदाज कुलदीपने माघारी धाडले. मात्र जो रूटने एकहाती खिंड लढवताना इंग्लंडला 7 बाद 322 धावांचा पल्ला गाठून दिला. कर्णधार इयॉन मॉर्गनने उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. रूटने कारकीर्दितील 12 वे शतक झळकावले. डेव्हिड विलीनेही आतषबाजी केली. त्याने 30 चेंडूंत 50 धावा केल्या. तो अखेरच्या चेंडूवर बाद झाला.
- जो रूटचे शतक, इंग्लंड 48 षटकांत 6 बाद 300 धावा
- इंग्लंडच्या 40 षटकांत 5 बाद 229 धावा
- इंग्लंडला पाचवा झटका, बटलर बाद
-बेन स्टोक्स आऊट, हार्दिक पांड्याला यश
- इंग्लंडने ओलांडला दोनश धावांचा पल्ला
- कुलदीपने मॉर्गनला बाद केले, शिखर धवनचा अप्रतिम झेल
- मॉर्गनचेही अर्धशतक
- 30 षटकांत 2 बाद 185 धावा
- जो रूटचे अर्धशतक, कारकीर्दितले 29वे तर लॉर्डवरील 5वे अर्धशतक
- इंग्लंडच्या दिडशे धावा, जो रूट व इयॉन मॉर्गनची संयमी खेळी
- इंग्लंड 20 षटकांत 2 बाद 121 धावा
- इंग्लंड 15 षटकांत 2 बाद 88 धावा
- इंग्लंडला दुसरा धक्का, रॉय 40 धावांवर माघारी
- कुलदीपला यश, बेअरस्टाे 38 धावांवर बाद
- जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांची फटकेबाजी, 10 षटकांत बिनबाद 69 धावा
- पाच षटकांत इंग्लंडच्या 31 धावा
इंग्लंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा विराटसेनाचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात इंग्लंडकडून जोस बटलरला फलंदाजी क्रमामध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याने पहिल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतकी खेळी केली आणि फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले होते. इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना बांधून ठेवण्यात अपयशी ठरले. पहिल्या सामन्यात विराट-रोहित-धवन यांनी दमदार फंलदाजी केली होती. या कामगिरीकडे पाहून असे दिसते की भारत ही मालिका 3-0 अशी जिंकू शकेल. त्यामुळे जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आता भारताच्या कब्जात येऊ शकते. लॉर्ड्स येथील या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.