कार्डिफ : पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा भारतीय संघ आज होणाऱ्या दुुस-या टी-२० त इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने खेळणार आहे.कुलदीपने २४ धावांत अर्धा संघ बाद केल्यानंतर लोकेश राहुलने नाबाद शतक झळकावून संघाला आठ गड्यांनी सहज विजय मिळवून दिला. यामुळे भारतीय संघ सलग सहाव्या विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ही घोडदौड नोव्हेंबर २०१७ ला न्यूझीलंडवरील विजयापासून सुरू झाली. तेव्हापासून भारताने एकही द्विपक्षीय मालिका गमविलेली नाही. भारताने मालिका २-० ने जिंकल्यास आॅस्ट्रेलियाच्या तुलनेत आयसीसी रँकिंगमध्ये अंतर कमी होईल. ३-० ने विजय मिळाल्यास भारत दुसºया स्थानावर येईल. इंग्लंडने मालिका गमविल्यास न्यूझीलंड, द. आफ्रिका व वेस्ट इंडिज सातव्या स्थानावर घसरतील.इंग्लंडसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी कुलदीप यादव आहे. त्याचा मारा यजमान खेळाडूंना समजलेला नाही. इंग्लंडने चांगलाच धसका घेतला असून आज सरावादरम्यान फिरकीवर तासन्तास फलंदाजी केली.
पावसाची शक्यता...या सामन्यात हवामान खलनायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधी ऊन होते. सायंकाळी ढगाळ वातावरण झाले आणि अचानक पावसाने हजेरी लावली.
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जानी बेयरस्टॉ, जॅक बॉल, जोस बटलर, सॅम कुरेन, अॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियॉम प्लंकेट, आदिल रशीद, ज्यो रुट, जेसन राय, डेव्हिड विले, डेव्हिड मालान.
सामना: रात्री १० वाजल्यापासून. स्थळ : सोफिया गार्डन्स