Join us  

Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I : ५ महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार?

भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी विराटची संघात निवड करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 3:21 PM

Open in App

India vs England 2nd T20I : पाच महिन्यांनंतर विराट कोहली भारताच्या ट्वेंटी-२० संघात परतणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी विराटची संघात निवड करण्यात आली आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत विराटला १० ट्वेंटी-२० सामन्यांना मुकावे लागले आणि त्याचा फॉर्म हा सध्या चिंतेचा विषय बनलेला आहे. विराटची कामगिरी अशीच राहिली तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी निवडणाऱ्या संघातून त्याला डच्चू दिला जाऊ शकतो. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांत दमदार कामगिरी करावी लागणार आहे. पण, दुसऱ्या ट्वेंट-२०त तो कोणत्या क्रमांकावर खेळेल, हा खरा प्रश्न आहे.  

विराट कोहलीने मागितली विश्रांती; सौरव गांगुली म्हणाला, सलग १३ वर्ष खेळलो, कधी विश्रांती घेतली नाही ना ब्रेक!

विराट कोहली तसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तो सलामीला खेळलो होता. आयपीएल २०२२मध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तो आयपीएल २०२२मध्ये तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला होता आणि त्याने १६ सामन्यांत २२.७३च्या सरासरीने केवळ ३ ४१ धावा केल्या होत्या. त्यामुळे फलंदाजीचा क्रम  बदलूनही त्याला फार फायदा झाला नाही. भारताकडून मागील पाच डावांमध्ये त्याला दोन अर्धशतकं झळकावता आलेली आहेत. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराटला आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाच ट्वेंटी-२० सामन्यात खेळणार आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याला ९ ते १० ट्वेंटी-२० सामने खेळण्याची संधी आहे आणि त्यातच त्याला फॉर्म मिळवायचा आहे. विराटने फॉर्म न मिळवल्यास वर्ल्ड कपसाठी ओपनर म्हणून इशान किशनचा BCCI विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत इशान व रोहित हे सलामीला येत आहेत. पण, विराट व रोहितने अहमदाबाद येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे विराटचे पुनरागमन इशानसाठी चिंता वाढवणारे ठरू शकते.  पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघरचनेत फार बदल करण्याच्या बाजूने नाही. 

दुसऱ्या ट्वेंटी-२०साठी संभाव्या प्लेइंग इलेव्हन ( India Playing XI vs ENG 2nd T20 ) -रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक/रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरोहित शर्मारिषभ पंतइशान किशन
Open in App