मुंबई- जेम्स अँडरसनच्या अप्रतिम स्पेलनंतर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने भारतीय फलंदाजांची लक्तरे वेशीला टांगली. अँडरसनने पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारताला १४ धावांवर दोन धक्के दिले होते. त्यानंतर ब्रॉडने मधली फळी गुंडाळली. भारताची अवस्था ६ बाद ६६ अशी झाली होती. संघाचा तारणहार विराट कोहली यालाही ब्रॉडने बाद केले. २० वर्षीय ऑली पोपने सिली पॉइंटला विराटचा अप्रतिम झेल टिपला आणि भारतीयांच्या उरलेल्या अपेक्षाही मिटवून टाकल्या.
( India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव )
पाठीच्या दुखण्यामुळे विराट पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नव्हता. काही चेंडूंचा सामना केल्यानंतर विराटच्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढलं. पण त्याच्या खेळपट्टीवर असल्याने भारतीयांच्या अपेक्षाही जीवंत होत्या. सत्रातील ११वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ब्रॉडने लेग साईटला जाणारा शॉर्ट चेंडू टाकला. यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो आणि इंग्लंडच्या खेळाडूनी कॅचची अपील केली. पंच अलीम दार यांनी नाबादचा निर्णय दिला. पण कर्णधार जो रूटने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. तो रिव्ह्यू वाया गेला.
ब्रॉडने पुढचा चेंडूही तसाच टाकला आणि यावेळी चेंडू विराटच्या ग्लोजचे चुंबन घेत सिली पॉइंटला उभ्या असलेल्या पोपच्या दिशेने उडाला. पोपने पुढे झेपावत सुरेखरित्या झेल टिपला. यावेळी विराटने रिव्ह्यू मागितला पण नशीब त्याच्या बाजूने नव्हते. पुढच्याच चेंडूवर ब्रॉडने दिनेश कार्तिकला बाद केले आणि त्याने एकाच मैदानावर ८३ विकेट घेण्याच्या हिथ स्ट्रीक यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पोपची ती कॅच पाहण्यासाठी व्हिडीओ बघा...
( India vs England 2nd Test: जेम्स अँडरसन; लॉर्ड्सवरील शतकवीर!)