लंडन - पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडवर विजय मिळवला. (India vs England 2nd Test: ) दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बऱ्याचवेळा गरमागरमी होतानाही दिसून आली. (Virat Kohli) एकीकडे सामन्यावरील पकड निसटू लागल्यावर इंग्लिश खेळाडूंनी स्लेजिंग केली. तर दुसरीकडे भारताच्या खेळाडूंनीही या स्लेजिंगला तोंड आणि खेळ अशा दोन्ही माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून शिविगाळ केल्याचा दावा केला जात आहे. ( Abuses by Virat Kohli from Lord's balcony? Umpire advised to keep his mouth shut, what exactly happened? Watch the video)
लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद शमी (नाबाद ५६) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद ३४) यांनी केलेल्या अभेद्य ८९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने ८ बाद २९८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान देत इंग्लंडला १२० धावांत गुंडाळत सामना १५१ धावांनी जिंकला होता. सामना सुरू असताना भारताचा कर्णधार विराट कोहली याने लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून शिविगाळ केल्याचा दावा केला जात आहे.
त्याचे झाले असे की, खेळपट्टीवर जसप्रीत बुमरा संयमाने फलंदाजी करत असताना त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी मार्क वुड याने स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बुमराह वैतागला. त्याने याची पंचांकडे तक्रार केली. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शमी याबाबत पंचांसोबत बोलत असताना दिसत आहे. तर पंच त्याला तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्यास सांगत आहेत. दरम्यान, विराट कोहली बाल्कनीमधून हे सर्व पाहताना दिसत आहे. त्यादरम्यान, तो टाळ्या वाजवत बुमराहचा उत्साह वाढवताना दिसत आहे. तसेच रागाने काही बोलतानाही दिसत आहे, दरम्यान, विराटचा हा व्हिडीओ पाहून त्याने शिविगाळ केल्याचा दावा केला जात आहे.