India vs England 2021 2nd test match live cricket score : इंग्लंडनं घेतलेल्या २७ धावांच्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. अशात फॉर्मात नसलेली अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानावर होती. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून कोणी आशाही ठेवल्या नव्हत्या, परंतु टीम इंडियाच्या मदतीला ही अनुभवी जोडीच धावून आली. अजिंक्य रहाणेनं १२५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना पुजारासह शतकी भागीदारीच्या दिशेनं वाटचाल केली. १५ ऑगस्टला अजिंक्यनं अर्धशतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा महेंद्रसिंग धोनीनंतरचा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. यासह अजिंक्य व पुजारा जोडीनं १९५९ सालचा मोठा विक्रम मोडला. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला. शमी दोन, इशांत शर्मा तीन आणि सिराजने चार विकेट्स घेतल्या. जो रूट ३२१ चेंडूंत १८ चौकारांसह १८० धावांवर नाबाद राहिला. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर धावफलकावर २७ धावा असताना माघारी परतले. लोकेश राहुल ३० चेंडूंत ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर १२व्या षटकात रोहित ( २१) बाद झाला. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
चिटर...?; इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडू कुरतडण्यासाठी लढवली शक्कल, स्टुअर्ट ब्रॉडचा बचाव!
सॅम कुरनच्या बाहेर जाणारा चेंडू छेडण्याच्या नादात विराट कोहली ( २०) यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद होऊन माघारी परतला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. या दोघांनी सावध खेळ करताना सामना अनिर्णीत राखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांकडून चिटिंग झालेली पाहायला मिळाली. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन हे ते दोन गोलंदाज असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यांनी चेंडू कुडतडण्यासाठी बुटांच्या स्क्रूचा वापर केलेला पाहायला मिळाले. दरम्यान, अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील १६वा आणि भारताचा ५वा फलंदाज आहे. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live
विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!
पुजारा आणि रहाणे यांनी १७८ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. डिसेंबर २०१८नंतर पुजारा आणि रहाणे यांची ही पहिलीच अर्धशतकीय भागीदारी ठरली. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ८७ धावांची भागीदारी केली होती. भारताच्या मागील २० वर्षांच्या कसोटी इतिहासात ही दुसरी सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी ठरली. हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी मागच्या वर्षी सिडनी कसोटीत २४६ चेंडूंत ५० धावा जोडल्या होत्या. रहाणेला ३१ धावांवर असताना जॉनी बेअरस्टोनं झेल सोडून जीवदान दिले. ( Rahane cuts, Bairstow drops and England would be gutted). रहाणेनं १२५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली.
लॉर्ड्सवरील कोसटीत भारतीयांनी नोंदवलेली ही चौथ्या विकेट्ससाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या जोडीनं आतापर्यंत १०० धावांची भागीदारी केली आहे. लॉर्ड्सवरील चौथ्या विकेटसाठी भारताची ही पहिली शतकी भागीदारी ठरेली. पुजारा२०६ चेंडूंत ४५ धावांवर बाद झाला. ( This is the highest 4th wicket partnership for India at Lord's in Test cricket and this is one of the most important as well. Well done, Rahane and Pujara.)
लॉर्ड्सवरील चौथ्या विकेट्ससाठीची सर्वोत्तम भागीदारी ( भारतीय फलंदाज) १०० - रहाणे/पुजारा, २०२१
८३ - काँट्रॅक्टर/घोरपडे, १९५९
७१ - अझरुद्दीन/वेंगसरकर, १९८६
५९ - गांगुली/ कार्तिक, २००७
Web Title: India vs England 2nd Test : Ajinkya Rahane & Cheteshwar Pujara 100 runs partnership; First century stand for the 4th wicket at Lord's by an Indian pair
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.