India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे. इंग्लंडच्या वर्चस्वाला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनी सुरूंग लावताना टीम इंडियाची मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. रहाणे व पुजाराच्या अपयशावर टीकेचे बाण चालवणारे आजच्या खेळीनंतर कौतुकाच्या फुलांचा वर्षाव करताना दिसले. लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटीत भारताच्या चौथ्या क्रमांकाच्या जोडीला आतापर्यंत शतकी भागीदारी करता आली नव्हती. पण, रहाणे-पुजारा जोडीनं हाही विक्रम केला अन् १९५९नंतरची ही भारताची सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण, हे सेट फलंदाज बाद झाले अन् टीम इंडियावर पुन्हा प्रेशर निर्माण झाला आहे. पाचव्या दिवशी रवींद्र जडेजाची फिरकी निर्णायक ठरणार आहे. Ind vs End 2nd test match live
अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा यांनी रचला इतिहास, १९५९नंतर लॉर्ड्सवर भारतीय जोडीनं केला विक्रम खास!
इंग्लंडनं घेतलेल्या २७ धावांच्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. अशात फॉर्मात नसलेली अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानावर होती. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून कोणी आशाही ठेवल्या नव्हत्या, परंतु टीम इंडियाच्या मदतीला ही अनुभवी जोडीच धावून आली. संयम, फटक्यांमध्ये नजाकत अन् प्रचंड एकाग्रता... या दोघांचा परतलेला फॉर्म पाहून भारतीय चाहते आनंदात होते. कर्णधार विराट कोहलीच्या पडलेल्या चेहऱ्यावरही हसू उमटले अन् तोही ड्रेसिंग रुममधून बाहेर येत लॉर्ड्सच्या बालकनीवर येऊन बसला. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
चिटर...?; इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडू कुरतडण्यासाठी लढवली शक्कल, स्टुअर्ट ब्रॉडचा बचाव!
विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!
चौथ्या दिवस अखेर भारतानं ६ बाद १८१ धावा करताना १५४ धावांची आघाडी घेतली आहे. खराब विद्युत प्रकाशामुळे चौथ्या दिवसांचा खेळ ८ षटकं आधीच थांबवण्यात आला. रिषभ १४ धावांवर खेळत आहे.