मुंबई - इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने लॉर्ड्स कसोटीत शुक्रवारी भारतीय फलंदाजांना हैराण केले. त्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट घेऊन एक वेगळा विक्रम नावावर केला. त्याने भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला.
अँडरसनने घरच्या मैदानांवर 351 विकेट घेताना कुंबळेचा 350 विकेटचा विक्रम मोडला. घरच्या प्रेक्षकांसमोर सर्वाधिक विकेट घेणा-या खेळाडूंमध्ये तो दुस-या स्थानी विराजमान झाला आहे. कुंबळेने घरच्या मैदानावरील 63 कसोटीत 24.80च्या सरासरीने 350 विकेट घेतल्या होत्या. या विक्रमात श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आघाडीवर आहे. त्याने 493 विकेट घेतल्या आहेत. 36 वर्षीय अँडरसनने 2003 साली लॉर्ड्स येथेच झिम्बाब्वे येथे कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्याने घरच्या प्रेक्षकांसमोर 80 कसोटींत 351 विकेट घेतल्या आहेत.
घरच्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
493 मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका)
351 जेम्स अँडरसन ( इंग्लंड)
350 अनिल कुंबळे ( भारत
319 शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया)
289 ग्लेन मॅक्ग्रा ( ऑस्ट्रेलिया)
Web Title: India vs England 2nd Test: Anil Kumble's record breaks by James Anderson
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.