India vs England, 2nd Test : रेकॉर्डेड टाळ्यांची गरज नाही, चेन्नई कसोटीत प्रेक्षक परतले; BCCIनं पोस्ट केला भावनिक Video

India vs England, 2nd Test Day 1 : तब्बल वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांनी एन्ट्री होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 09:29 AM2021-02-13T09:29:59+5:302021-02-13T09:31:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 2nd Test : BCCI Posts Emotional Video as Crowds Return to Stadiums in India | India vs England, 2nd Test : रेकॉर्डेड टाळ्यांची गरज नाही, चेन्नई कसोटीत प्रेक्षक परतले; BCCIनं पोस्ट केला भावनिक Video

India vs England, 2nd Test : रेकॉर्डेड टाळ्यांची गरज नाही, चेन्नई कसोटीत प्रेक्षक परतले; BCCIनं पोस्ट केला भावनिक Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd Test Day 1 : तब्बल वर्षभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांनी एन्ट्री होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईत खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांना BCCIनं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता रेकॉर्डेड टाळ्या वाजवण्याची गरज नाही. प्रेक्षकांच्या स्वागतासाठीही BCCIनं एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. BCCI लिहिलं की, प्रिय चाहत्यांनो आम्ही तुम्हाला मिस करत होतो आणि आता तुमचे आम्ही स्वागत करत आहोत. चेपॉकवर तुम्हाला टीम इंडियासाठी चिअर करताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत.''  अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, जसप्रीत बुमराहला विश्रांती; टीम इंडियानं नाणेफेक जिंकली

पाहा व्हिडीओ...


टीम इंडियात तीन महत्त्वाचे बदल
कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही, याची उत्सुकताही संपली आहे. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज नदीम आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली असून त्यांच्याजागी कुलदीप, अक्षर पटेल ( पदार्पण) आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे.

टीम इंडिया ( Team India's playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज 

इंग्लंडचा संघ ( England's playing XI for 2nd Test) :  - जो रुट ( कर्णधार) , मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, बेन फोक्स ( यष्टिरक्षक), डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन.
 

Web Title: India vs England, 2nd Test : BCCI Posts Emotional Video as Crowds Return to Stadiums in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.