India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ; सोशल मीडियावर चांगलाच समाचार

India vs England 2nd Test: भारतीय संघाने एडबॅस्टन कसोटीपेक्षा सुमार कामगिरी लॉर्ड्सवर केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संघावर भलतेच संतापले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 11:37 AM2018-08-12T11:37:28+5:302018-08-12T11:59:10+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test: Beef in team india menu; BCCI trolled in social media | India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ; सोशल मीडियावर चांगलाच समाचार

India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ; सोशल मीडियावर चांगलाच समाचार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉर्ड्स- भारतीय संघाने एडबॅस्टन कसोटीपेक्षा सुमार कामगिरी लॉर्ड्सवर केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संघावर भलतेच संतापले आहेत. दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव १०७ धावांवर गडगडला आणि इंग्लंडच्या संघावर जरब बसवण्याची संधी गोलंदाजांनी गमावली. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर २५० धावांची आघाडी घेतली आहे. नाराज झालेल्या चाहत्यांना BCCI ने आयतं कोलीतच दिले. 

( ख्रिस व्होक्सचे शतक, इंग्लंडची कसोटीवर मजबूत पकड )

तिसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत भारताने इंग्लंडच्या चार फलंदाजांना अवघ्या ८९ धावांत माघारी धाडले होते. पण उपहारानंतर भारतीय गोलंदाजांना केवळ दोनच विकेट घेता आल्या. जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी जबाबदारीने खेळ करताना भारताच्या हातून सामना हिरावून घेतला. उपहाराला जाण्यापूर्वी BCCIने त्यांच्या ट्विटरवर लॉर्ड्सवरील मेन्यू टाकला होता. 



भारताने सामन्यावर पकड घेण्याची संधी गमावल्यानंतर नेटिझन्सनी BCCI आणि टीम इंडियाचा चांगलाच समाचार घेतला. त्यात मेन्यूमध्ये 'braised beef pasta' हा पदार्थ पाहिल्यानंतर नेटिझन्स चांगलेच संतापले. अर्थात हा मेन्यू दोन्ही संघासाठी असल्याने कोणी काय खावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न होता. पण भारतीय संघाच्या लाजीरवाण्या कामगिरीचा सगळा राग नेटिझन्सने सोशल मीडियावर काढला. 

Web Title: India vs England 2nd Test: Beef in team india menu; BCCI trolled in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.