लॉर्ड्स- भारतीय संघाने एडबॅस्टन कसोटीपेक्षा सुमार कामगिरी लॉर्ड्सवर केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संघावर भलतेच संतापले आहेत. दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव १०७ धावांवर गडगडला आणि इंग्लंडच्या संघावर जरब बसवण्याची संधी गोलंदाजांनी गमावली. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर २५० धावांची आघाडी घेतली आहे. नाराज झालेल्या चाहत्यांना BCCI ने आयतं कोलीतच दिले.
( ख्रिस व्होक्सचे शतक, इंग्लंडची कसोटीवर मजबूत पकड )
तिसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत भारताने इंग्लंडच्या चार फलंदाजांना अवघ्या ८९ धावांत माघारी धाडले होते. पण उपहारानंतर भारतीय गोलंदाजांना केवळ दोनच विकेट घेता आल्या. जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी जबाबदारीने खेळ करताना भारताच्या हातून सामना हिरावून घेतला. उपहाराला जाण्यापूर्वी BCCIने त्यांच्या ट्विटरवर लॉर्ड्सवरील मेन्यू टाकला होता.