India vs England, 2nd Test Day 1 : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) विकेटने सर्वांन वेड लावलं आहे. मोईन अलीच्या ( Moeen Ali) अप्रतिम चेंडूवर विराटचा त्रिफळा उडाला. या विकेटवर विराटलाच विश्वास बसत नव्हता आणि म्हणूनच तो नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) खरंच बाद झाला का, याबाबत खात्री करून घेत होता. पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत टीम इंडियानं ३ फलंदाज गमावत १०६ धावा केल्या आहेत. ( A contender for ball of the decade? Virat Kohli can't believe it) विराट कोहली आला अन् गेला; १५०व्या सामन्यात नकोसे विक्रम नावावर केले, Video
दुसऱ्याच षटकात शुबमन गिल ( Shubman Gill) याची विकेट पडली, परंतु रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सारवला. जॅक लिचनं पुजाराला ( २१) माघारी जाण्यास भाग पाडले.
विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. मोईन अलीच्या ( Moeen Ali) अप्रतिम फिरकी चेंडूनं विराटचा त्रिफळा उडवला अन् स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली.
रोहित शर्माचा फॉर्म परतला अन् विराट कोहलीच्या जीवात जीव आला, Videoविराट कोहलीच्या नावावर नकोसे विक्रम
- विराट कोहली सर्वाधिक ४ वेळा इंग्लंडिवरुद्ध शून्यावर भोपळ्यावर माघारी परतला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ३), वेस्ट इंडिज ( ३), बांगलादेश ( १) आणि श्रीलंका ( १) यांचा क्रमांक येतो.
- विराट कोहली कसोटीत एकूण १२वेळा शून्यावर बाद झाला आहे, परंतु फिरकीपटूच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर बाद होण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.
- २०१९ इंदौर कसोटीत विराट अखेरचा ( वि. बांगलादेश) शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आज विराटवर ही नामुष्की ओढावली.
- १५०व्या सामन्यात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली ९व्या क्रमांकावर आहे. कुमार संगकारा ( ७९१३), सचिन तेंडुलकर ( ७८६९), वीरेंद्र सेहवाग ( ७६९४), राहुल द्रविड ( ७६८०), गॅरी सोबर्स ( ७६२६), जावेद मियाँदाद ( ७५३६), व्हिव्ह रिचर्ड्स ( ७४८७), सुनील गावस्कर ( ७४०५), विराट ( ७४०१) व मोहम्मद युसूफ ( ७४०१) हे आघाडीवर आहेत. पिवळं जॅकेट, डोळ्यावर गॉगल; चेन्नई कसोटीत सर्वांचे लक्ष वेधणारी 'ती' कोण?
- सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराट दुसऱ्या स्थानी आला आहे. सौरव गांगुली १३ वेळा, विराट १२ आणि महेंद्रसिंग धोनी ११ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
Web Title: India vs England, 2nd Test : A contender for ball of the decade? Virat Kohli can't believe it, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.