Join us  

India vs England, 2nd Test : विराट कोहली आला अन् गेला; १५०व्या सामन्यात नकोसे विक्रम नावावर केले, Video

India vs England, 2nd Test Day 1 : रोहित दमदार फटकेबाजी करत असताना चेतेश्वरही दुसऱ्या बाजूनं साजेशी साथ देत होता. पण, जॅक लिचनं त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. चेतेश्वर २१ धावांवर बाद झाला अन् रोहितसह त्याची ८५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 12:01 PM

Open in App

India vs England, 2nd Test Day 1 : शुबमन गिलच्या ( Shubman Gill) विकेटनंतर टीम इंडियाला रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) या जोडीनं सावरलं. या दोघांनी ११३ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली, परंतु इंग्लंडनं लागोपाठ दोन विकेट्स घेत सामन्यात पुन्हा मुसंडी मारली. १५०वा कसोटी सामना खेळणारा विराट कोहली ( Virat Kohli) फक्त ५ चेंडू खेळला अन् ज्या चेंडूवर विकेट पडली, ते पाहून त्यालाही धक्का बसला. प्रेक्षकही शांत बसले... पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत टीम इंडियानं ३ फलंदाज गमावत १०६ धावा केल्या आहेत. रोहित शर्माचा फॉर्म परतला अन् विराट कोहलीच्या जीवात जीव आला,  Video

मॅच हायलाईट्स...- दुसऱ्याच षटकात शुबमन गिल ( Shubman Gill) याची विकेट पडल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडेल, असे वाटत होते. पण, चेन्नईच्या स्टेडियवर प्रेक्षकांच्या पुनरागमनासोबतच रोहित शर्माचा ( Rohit Sharma) फॉर्मही परतला. 

- रोहित दमदार फटकेबाजी करत असताना चेतेश्वरही दुसऱ्या बाजूनं साजेशी साथ देत होता. पण, जॅक लिचनं त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. चेतेश्वर २१ धावांवर बाद झाला अन् रोहितसह त्याची ८५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. पिवळं जॅकेट, डोळ्यावर गॉगल; चेन्नई कसोटीत सर्वांचे लक्ष वेधणारी 'ती' कोण?

- विराट कोहलीचा खेळ पाहायला मिळेल, यासाठी आनंदात असलेल्या चाहत्यांना पाचव्या चेंडूवरच निराश व्हावे लागले. मोईन अलीच्या ( Moeen Ali) अप्रतिम फिरकी चेंडूनं विराटचा त्रिफळा उडवला अन् स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. 

-  विराट कोहली सर्वाधिक ४ वेळा इंग्लंडिवरुद्ध शून्यावर भोपळ्यावर माघारी परतला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ३), वेस्ट इंडिज ( ३), बांगलादेश ( १)  आणि श्रीलंका ( १) यांचा क्रमांक येतो.

-  विराट कोहली कसोटीत एकूण १२वेळा शून्यावर बाद झाला आहे, परंतु फिरकीपटूच्या गोलंदाजीवर भोपळ्यावर बाद होण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिस्बेनमध्ये मिळवून दिला विजय, चेन्नईत वाचवली लाज; तरीही दुसऱ्या कसोटीतून संकटमोचक खेळाडूला डच्चू

-  २०१९ इंदौर कसोटीत विराट अखेरचा ( वि. बांगलादेश) शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आज विराटवर ही नामुष्की ओढावली.

- १५०व्या सामन्यात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली ९व्या क्रमांकावर आहे. कुमार संगकारा ( ७९१३), सचिन तेंडुलकर ( ७८६९), वीरेंद्र सेहवाग ( ७६९४), राहुल द्रविड ( ७६८०), गॅरी सोबर्स ( ७६२६), जावेद मियाँदाद ( ७५३६), व्हिव्ह रिचर्ड्स ( ७४८७), सुनील गावस्कर ( ७४०५), विराट ( ७४०१) व मोहम्मद युसूफ ( ७४०१) हे आघाडीवर आहेत.

-  सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराट दुसऱ्या स्थानी आला आहे. सौरव गांगुली १३ वेळा, विराट १२ आणि महेंद्रसिंग धोनी ११ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरोहित शर्माचेतेश्वर पुजाराशुभमन गिल