India vs England, 2nd Test Day 2: रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांनी रचलेल्या मजबूत पायावर टीम इंडियाच्या अन्य शिलेदारांना धावांचे इमले रचता आले नाही. ६ बाद ३०० धावांवरून दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात मोईन अलीनं ( Moeen Ali) दोन धक्के दिले. पण, रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. याचसोबत त्यानं २०२१मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा पूर्ण केला. भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला... रिषभ ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. Rishabh Pant अन् बेन फोक्स यांच्यात राडा; भारतीय खेळाडूचा स्ट्राइक घेण्यास नकार, Video
"चेन्नईची खेळपट्टी फालतू, कसोटीच्या लायकीची नाही"; मांजरेकर संतापलेभारताच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटीतील चेन्नईच्या खेळपट्टीवरुन जोरदार आक्षेप नोंदवला जात आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन, इयान बेल आणि भारताचे माजी फलंदाज संजय मांजेरकर (Sanjay Manjrekar) यांनी चेन्नईच्या खेळपट्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. वॉन यांनी तर चेन्नईच्या खेळपट्टीला सागरी किनारा म्हणत खिल्ली उडवली आहे. तर संजय मांजेरकर यांनी खेळपट्टी अतशिय फालतू आणि कसोटी क्रिकेटच्या लायकीची नसल्याचं म्हटलं आहे. अजिंक्य रहाणेचा भीमपराक्रम; विराट, रोहित यांनाही अद्याप जमला नाही 'हा' विक्रम
संजय मांजरेकर यांनी खेळपट्टीच्याअजब कारभाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "मी काही कडक शब्दांत व्यक्त झालो मग मला सोशल मीडियात ट्रोल केलं जातं. पण ही खेळपट्टी कसोटी खेळायच्या लायकीचीच नाही. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची फलंदाजी आणि गोलंदाजीची अपेक्षा असतो तेव्हा त्या दर्जाची खेळपट्टी देखील तयार करायला हवी. पहिल्याच दिवसाचा अवघ्या अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर खेळपट्टीला चिरा पडत असतील तर हे चुकीचं आहे. या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणता येणार नाही. अतिशय फालतू खेळपट्टी तयार करण्यात आली आहे", असं संजय मांजरेकर म्हणाले. जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!
इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल म्हणाला की ज्यापद्धतीचा खेळपट्टीचा नूर पहिल्या दिवशी पाहायला मिळतोय ते पाहता खेळ पाचव्या दिवसापर्यंत जाईल असं वाटत नाही. तर दुसरीकडे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी तर चेन्नईच्या खेळपट्टीला थेट समुद्र किनाऱ्यांचीच उपमा दिली आहे. "चेन्नईचा 'पीच' नसून 'बीच' आहे. जर नाणेफेक गमावूनही इंग्लंडने विजय प्राप्त केला तर हा इंग्लंडसाठी शानदार विजय ठरेल", असं वॉन म्हणाले.