मुंबई - भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातले आणि अवघ्या तीन दिवसांत भारताला डावाने पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर गेला असून येथून कमबॅक करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २८९ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना भारताला एक डाव आणि १५९ धावांनी हार पत्करावी लागली. २०१४ च्या ओव्हल कसोटीनंतर आणि विराटच्या नेतृत्वाखालीलही भारताचा हा पहिलाच डावाने पराभव ठरला.
( India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव)
( India vs England 2nd Test: 20 वर्षीय पोपने टिपला विराटचा अप्रतिम झेल )
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला २०१४ च्या ओव्हल कसोटीत डावाने पराभव स्वीकारावा लागला होता. लॉर्ड्सवरील पराभव हा विराटच्या नेतृत्वाखालील पहिलाच डावाने पराभव ठरला. लॉर्ड्सवर १८ कसोटीमधील हा १२वा, तर इंग्लंडमधील ५९ कसोटींतील ३२वा पराभव ठरला.