India vs England 2nd Test : ओह माय 'लॉर्ड्स'; नाट्यमय कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, मालिकेत १-० अशी आघाडी!

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : कसोटी क्रिकेटची रोमहर्षकता काय असते ते लॉर्ड्सवरील सामन्यातून पाहायला मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:06 PM2021-08-16T23:06:20+5:302021-08-16T23:14:22+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test: India win second Test against England by 151 runs, take lead by 1-0 | India vs England 2nd Test : ओह माय 'लॉर्ड्स'; नाट्यमय कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, मालिकेत १-० अशी आघाडी!

India vs England 2nd Test : ओह माय 'लॉर्ड्स'; नाट्यमय कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, मालिकेत १-० अशी आघाडी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं चौथ्या दिवशी विक्रमी १०० धावांची भागारी करून विजयाचा पाया रचलापाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना नाबाद ८९ धावांची भागीदारी केलीमोहम्मद सिराजनं सर्वाधिक चार, जसप्रीतनं तीन, इशांत शर्मानं दोन आणि शमीनं एक विकेट घेतली

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : कसोटी क्रिकेटची रोमहर्षकता काय असते ते लॉर्ड्सवरील सामन्यातून पाहायला मिळाली. नाट्यमय ठरलेल्या लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं वर्चस्व गाजवले. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीनं ऐतिहासिक खेळी करताना संघाला विजयाचे स्वप्न दाखवले. पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अनपेक्षित कामगिरी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील गायब झालेला आनंद परतला. मोईन अली अन् जोस बटलर यांनी टीम इंडियाच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद सिराजनं दोन चेंडूवर दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. विराटनं ज्याचा झेल सोडला तो जोस बटलर भारताच्या मार्गात अजूनही उभा होताच. सिराजनं त्याचाही अडथळा दूर केला. भारतानं लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला. 
India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी २९७ चेंडूंचा सामना करताना १०० धावांची भागीदारी केली. लॉर्ड्स कसोटीवर भारताकडून चौथ्या विकेटसाठीची ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण टीम इंडियाच्या मदतीसाठी शेपूटच धावले. भारतानं ८ बाद २९८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी ७० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६, तर जसप्रीत ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या जोडीनं नाबाद ८९ धावांची भागीदारी करताना इतिहास घडवला. भारताबाहेरची ९ व्या व १० व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला जसप्रीत व शमी यांनी पहिल्या व दुसऱ्या षटकात धक्के दिले. रोरि बर्न्स व डॉम सिब्ली हे दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले. हसीब हमीद याला रोहित शर्माकडून जीवदान मिळाले, परंतु त्याचा फार मोठा फटका टीम इंडियाला बसला नाही. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली आहे. इशांतनं त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टोला ( २) पायचीत करून चौथा धक्का दिला. टी ब्रेकनंतर जसप्रीतनं भारताला हवी ती विकेट मिळवून दिली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ३३ धावांवर विराटच्या हाती झेल देऊन माघारी परतला. आता इंग्लंडची पराभव टाळण्याची परीक्षा खऱ्या अर्थानं सुरू झाली.Eng vs Ind 2nd test live score board

जसप्रीतच्या गोलंदाजीवर विराटनं स्लीपमध्ये जोस बटलरचा सोडलेला झेल टीम इंडियाला महागात पडतोय की काय अशी भीती वाटू लागली होती. त्यानंतर विराटनं रवींद्र जडेजाला बोलावले. ३६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोईन अली बीट झाला अन् चेंडू रिषभ पंतच्या हातात विसावला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केलं, पण अम्पायरकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे विराटनं DRS घेण्याचा निर्णय घेतला, पण तिसऱ्या अम्पायरनं तो चेंडू नो बॉल असल्याचे जाहीर केलं. तो नो बॉल नसता तर DRS मध्ये अली आऊट असल्याचे जाहीर झाले असते. पण, सिराजनं ही विकेट मिळवून दिली. अली ( १३) बाद झाला. पुढच्याच चेंडूवर सॅम कुरनही ( ०) माघारी परतला. सिराजची हॅटट्रिक हुकली, परंतु टीम इंडिया विजयासमीप पोहोचली होती. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live

अखेरच्या एका तासाच्या खेळात टीम इंडियाला विजयासाठी ३ विकेट्स हव्या होत्या, तर इंग्लंडला पराभव टाळण्यासाठी ९० चेंडू खेळून काढायची होती. एकेक षटक कमी होत होतं अन् विराटचं टेंशन पुन्हा वाढत जात होतं. विराटनं स्लेजिंग करून इंग्लंडच्या फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्नही केला. विराटनं आक्रमक क्षेत्ररक्षण लावत दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ५१व्या षटकात जसप्रीतनं राऊंड दी विकेट गोलंदाजी करताना ऑली रॉबिन्सनला पायचीत केले. रॉबिन्सननं ३५ चेंडूंत ९ धावा केल्या. आता भारताला ५५ चेंडूंत २ विकेट्स घ्यायच्या होत्या. पुढच्याच षटकात सिराजनं इंग्लंडची अखेरची होप बटलरला ( २५ धावा ९६ चेंडू) बाद केले. सिराजनं जेम्स अँडरसनची विकेट घेत भारताला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडचा डाव १२० धावांवर गडगडला. 

Web Title: India vs England 2nd Test: India win second Test against England by 151 runs, take lead by 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.