India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : पहिल्या दिवस गाजवल्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाला चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं फ्रंटसीटवर आणून बसवले. त्यानंतर पाचव्या दिवशी कमालच झाली. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या जोडीनं नाबाद ८९ धावांची भागीदारी करताना इतिहास घडवला. भारताबाहेरची ९ व्या व १० व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. लॉर्ड्स कसोटीच्या पावच्या दिवसाचे बुमराह व शमी यांनी गाजवले. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या विक्रमी भागीदारीनंतर लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी ही जोडी चमकली. खरंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण टीम इंडियासाठी शेपूटच धावले. जस्सी व शमीची फटकेबाजी पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूट हतबल झालेला पाहायला मिळाला, दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लॉर्ड्सच्या बालकनीत बसून या फटकेबाजीची मनसोक्त आनंद लुटत होता. १० वर्षांपूर्वी राहुल द्रविड व अमित मिश्रा यांनी किंग्स्टन कसोटीत ९व्या विकेटसाठी जो पराक्रम केला तोच या जोडीनं आज करून दाखवला. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
भारतानं ८ बाद २९८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी ७० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६, तर जसप्रीत ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला जसप्रीत व शमी यांनी पहिल्या व दुसऱ्या षटकात धक्के दिले. रोरि बर्न्स व डॉम सिब्ली हे दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले. हसीब हमीद याला रोहित शर्माकडून जीवदान मिळाले, परंतु त्याचा फार मोठा फटका टीम इंडियाला बसला नाही. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली आहे...
पाचवा दिवस गाजवणाऱ्या जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे संघाच्या खेळाडूंनी भारी स्वागत केले...