Join us  

India vs England 2nd Test: जेम्स अँडरसन; लॉर्ड्सवरील शतकवीर!

India vs England 2nd Test: इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने तिस-या षटकाच्या दुस-या चेंडूवर भारताचा सलामीवीर मुरली विजयला बाद केले आणि लॉर्ड्सवर शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 4:35 PM

Open in App

मुंबई - इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने दुस-या डावात तिस-या षटकाच्या दुस-या चेंडूवर भारताचा सलामीवीर मुरली विजयला बाद केले आणि लॉर्ड्सवर शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर शंभर विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. एकाच मैदानावर शंभर बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनेल. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याने तीन मैदानांवर प्रत्येकी शंभर पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.पावसाने व्यत्यय आणलेल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव १०७ धावांवरच आटोपला. पहिल्या डावात अँडरसनने इशांत शर्माला पायचीत पकडत भारताचा डाव संपवला. त्यासोबतच भारताचे सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम त्याने नोंदवला. भारताचे सर्वाधिक फलंदाज बाद करणा-या वेगवान गोलंदाजांच्या यादीत अँडरसनने पाकिस्तानच्या इम्रान खान (९४ बळी) यांना मागे टाकले. 

एकाच मैदानात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने कोलंबोतील एसएससी मैदानात १६६ बळी घेतले आहेत. त्यानेच कँडीच्या मैदानात ११७ आणि गालेच्या मैदानात १११ बळी घेतले आहेत.  

( India vs England 2nd Test: भारताची डावाने पराभव टाळण्यासाठी धडपड )

इंग्लंडने पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांनी 7 बाद 396 धावांवर डाव घोषित केला. सॅम कुरनला ( 40) हार्दिक पांड्याने बाद करताचा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने डाव घोषित केला. ख्रिस वोक्स 137 धावांवर नाबाद राहिला. वोक्सने 177 चेंडूंत 17 चौकार लगावत 137 धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा