Join us  

India vs England 2nd Test Live : रोहित शर्मा-लोकेश राहुल जोडी जमली; लॉर्ड्सवर ६९ वर्षांत भारतीय ओपनर्सना न जमलेली कामगिरी केली!

India vs England 2021 2nd test match live cricket score : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीत दमदार सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 7:02 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीत दमदार सुरुवात करून दिली. भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यातही पावसानं व्यत्यय आणला.  पावसामुळे खेळ उशीरा सुरू करावा लागला. त्यानंतर पावसामुळेच ६ मिनिटे आधी लंच घ्यावा लागला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकताना टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले अन् रोहित शर्मालोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिल. या दोघांनी १९५२ सालानंतर भारतीय ओपनर्संना लॉर्ड्सवर न करता आलेला पराक्रम करून दाखवला. त्यामुळे इंग्लंडची भंबेरी उडाली आहे. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

Photo : विराट, रोहित यांच्या मुंबईतील घराच्या किंमतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो विकतोय मँचेस्टर येथील वाडा!

शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार विराट कोहलीनं आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता होती आणि इशांत शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.  इंग्लंडने आज संघात तीन बदल केले. प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानं दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. त्याव्यतिरिक्त आजच्या सामन्यात झॅक क्रॅवली व डॅन लॉरेन्स यांना विश्रांती दिली असून त्यांच्याजागी हसीब हमीद, मोईन अली आणि मार्क वूड यांची निवड केली आहे. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी संयमानं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड नसल्याचा आणि जेम्स अँडरसन पूर्णपणे तंदुरूस्त नसल्याचा फटका इंग्लंडला बसलेला पाहायला मिळाला. रोहितनं कसोटीतील १३ वे व लॉर्ड्सवरील पहिलेच अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचार करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून मोठा विक्रम केला. १९५२नंतर लॉर्ड्सवर भारतीय सलामीवीरांनी पहिल्या डावात केलेली ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली. ( This is the first opening partnership of fifty runs in the first innings for India in Tests at Lord's since 1952.)  आणि १९७९नंतर लॉर्ड्सवरील ही सर्वोत्तम सलामीची भागीदारी आहे.  Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live  

 लॉर्ड्सवरील भारतीय सलामीवीरांची कामगिरी१३१ - फारुख इंजिनियर व सुनील गावस्कर ( दुसरा डाव), १९७४१०६ - वीनू मंकड व पंकज रॉय ( पहिला डाव), १९५२८७* - रोहित शर्मा व लोकेश राहुल ( पहिला डाव), २०२१७९ - चेतन चौहान व सुनील गावस्कर ( तिसरा डाव), १९७९ 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App