Join us  

India vs England 2nd Test Live : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; तगड्या फलंदाजासह अष्टपैलू खेळाडू मैदानावर उतरवला

India vs England 2021 2nd test match live cricket score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत पावसानं सुरुवात केली अन् त्यामुळे सामना विलंबाने सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 3:26 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत पावसानं सुरुवात केली अन् त्यामुळे सामना विलंबाने सुरू झाला. शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार विराट कोहलीनं आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता होती. आर अश्विनचं नाव चर्चेत होतं, परंतु त्याला अंतिम ११ आजही खेळवण्यात आले नाही. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( England have won the toss and will bowl. )  

पहिल्या सामन्यातील भारताची विजयाची संधी पावसाने हिरावल्यानंतर विराट सेना नव्या आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. मात्र, यावेळी भारताच्या फलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करावा लागेल. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात अजिंक्य रहाणेने लॉर्ड्सवर शतक झळकावण्याचा मान मिळवला होता. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने  संघाबाहेर गेला आहे. लॉर्ड्सवरील खेळपट्टी पाहूनही संघात बदल करण्यात आला आहे. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

इंग्लंडचा  कर्णधार जो रुटचा अपवाद वगळता इतर कोणालाही भारतीय गोलंदाजांचा ठामपणे सामना करता आला नाही. युवा फलंदाजांनी इंग्लंडला अत्यंत निराश केले आहे. इंग्लंडसाठी आणखी चिंता म्हणजे वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची दुखापत. त्यामुळे यजमानांना दुसऱ्या सामन्यात त्याच्याविना खेळावे लागत आहे. आनंदाची गोष्ट अशी की जेम्स अँडरसन फिट असून तो खेळत आहे. बुधवारी त्याच्या सहभागाबाबतची अनिश्चितता होती. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

  • हसीब हमीद, मोईन अली आणि मार्क वूड यांची निवड, झॅक क्रॅवली, डॅन लॉरेन्स आणि स्टुअर्ट ब्रॉड विश्रांती'
  • भारतीय संघात शार्दूल ठाकूरच्या जागी इशांत शर्माला खेळवण्यात आले आहे. 

India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन?

  • भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटविराट कोहलीइशांत शर्मा
Open in App