Join us  

India vs England 2nd Test Live : रोहित शर्माचे शतक हुकलं अन् अवघ्या पाच धावांनी गावस्कर-इंजिनियर यांचा विक्रम वाचला, Video 

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आता रोहितचेही नाव समाविष्ठ होईल असे वाटत होते आणि त्याच्या शतकाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 8:34 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीत दमदार सुरुवात करून दिली. लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आता रोहितचेही नाव समाविष्ठ होईल असे वाटत होते आणि त्याच्या शतकाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. पण, परदेशात कसोटीत रोहितची शतकाची प्रतीक्षा पुन्हा लांबली. जेम्स अँडसरसनच्या अप्रतिम चेंडूनं रोहितचा त्रिफळा उडवला अन् टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पण, रोहित बाद झाल्यामुळे सुनील गावस्कर व फारुख इंजिनियर यांनी १९७४मध्ये नोंदवलेला विक्रम अबाधित राहिला. 

रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी संयमानं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड नसल्याचा आणि जेम्स अँडरसन पूर्णपणे तंदुरूस्त नसल्याचा फटका इंग्लंडला बसलेला पाहायला मिळाला. रोहितनं कसोटीतील १३ वे व लॉर्ड्सवरील पहिलेच अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचार करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून मोठा विक्रम केला. १९५२नंतर लॉर्ड्सवर भारतीय सलामीवीरांनी पहिल्या डावात केलेली ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली. ( This is the first opening partnership of fifty runs in the first innings for India in Tests at Lord's since 1952.)  आणि १९७९नंतर लॉर्ड्सवरील ही सर्वोत्तम सलामीची भागीदारी आहे.  Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live  

या दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण करताना १९५२मध्ये मंकड व रॉय यांचा १०६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. रोहित जेव्हा ११९ चेंडूंत ८१ धावांवर होता, तेव्हा लोकेशनं ९५ चेंडूंत १७ धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित १४५ चेंडूंत ८३ धावांपर्यंत येईपर्यंत लोकेशनं ११८ चेंडूंत ३३ धावा केल्या होत्या. रोहित १४५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून ८३ धावांवर माघारी परतला आणि रोहित-लोकेश यांची भागीदारी १२६ धावांवर संपुष्टात आली. त्यामुळे सुनील गावस्कर व फारुख इंजिनियर यांचा लॉर्ड्सवरील १९७४ सालचा १३१ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला गेला नाही. 

इंग्लंडमध्ये भारतीय सलामीवीरांची टॉप फाईव्ह कामगिरी ( Highest Opening test partnership for India in England) 

  • चेतन चौहन व सुनील गावस्कर - २१३ धावा
  • विजय मर्चंट व मुश्ताक अली - २०३
  • वसीम जाफर व दिनेश कार्तिक - १४७
  • सुनील गावस्कर व फारुख इंजिनियर - १३१
  • रोहित शर्मा व लोकेश राहुल - १२६  

लॉर्ड्सवरील शतकवीर 

  • दिलीप वेंगसरकर - १०३, १५७ व १२६*
  • विनोद मंकड - १८४
  • सौरव गांगुल - १३१
  • मोहम्मद अझरुद्दीन - १२१
  • गुंडप्पा विश्वनाथ - ११३

अजित आगरकर - १०९राहुल द्रविड - १०३अजिंक्य रहाणे - १०३रवी शास्त्री - १०० 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मासुनील गावसकर
Open in App