India vs England 2nd Test Live : सॉलिड सुरुवातीनंतर टीम इंडिया गडगडली, ८ फलंदाज ९७ धावांत परतले तंबूत

India vs England 2nd Test Live Score अँडरसननं ६२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:05 PM2021-08-13T19:05:01+5:302021-08-13T19:09:09+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Cricket Score : India have been bowled out for 364, Five wickets for James Anderson  | India vs England 2nd Test Live : सॉलिड सुरुवातीनंतर टीम इंडिया गडगडली, ८ फलंदाज ९७ धावांत परतले तंबूत

India vs England 2nd Test Live : सॉलिड सुरुवातीनंतर टीम इंडिया गडगडली, ८ फलंदाज ९७ धावांत परतले तंबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस लोकेश राहुलरोहित शर्मा यांनी गाजवताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले होते. पण, इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी सॉलिड कमबॅक केला. जेम्स अँडरसननं पाच विकेट्स घेत लॉर्ड्सच्या बोर्डावर नाव कोरले. टीम इंडियाचे ८ फलंदाज ९७ धावांत माघारी परतले. 

सामाजिक कार्यात टीम इंडियाचा हातभार, जाणून घ्या काय असतो ‘Red for Ruth’ दिवस!

पहिल्या दिवशी रोहित १४५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून ८३ धावांवर माघारी परतला. त्यानं लोकेशसह  १२६ धावांची भागीदारी केली. लोकेश व कर्णधार विराट कोहली यांनी २०८ चेंडूंत ११७ धावा जोडल्या. विराट १०३ चेंडूंत ३ चौकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. लोकेशनं २५० चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून १२९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला ( १) जेम्स अँडरसननं पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. भारताचा निम्मा संघ २८२ धावांत माघारी परतला आहे. 

इंग्लंडमध्ये पहिल्या पाच कसोटी डावांत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये लोकेशनं चौथं स्थान पटकावलं. २००२मध्ये राहुल द्रविडनं ५५६ धावा केल्या होत्या आणि तो टॉपवर आहे. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ४३० ( १९९०), सचिन तेंडुलकर ४२८ ( १९९६) आणि लोकेश राहुल ४२५ ( २०२१) असा क्रमांक येतो. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पंत त्याच्या नेहमीच्या आक्रमक अंदाजात होता. पण, मार्क वूडनं त्याला बाद न होण्यासारख्या चेंडूवर माघारी जाण्यास भाग पाडले. पंत ३७ धावांवर झेलबाद झाला अन् जडेजासोबतची त्याची भागीदारी ४९ धावांवर संपुष्टात आली.   Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

जडेजा एका बाजूनं खिंड लढवत होता. इशांत शर्मानं त्याच्यासोबत २६ धावांची भागीदारी करून धावसंख्या वाढवली, परंतु टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात इंग्लंडला फार कष्ट घ्यावे लागले नाही. भारताचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला. अँडरसननं ६२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ( India bowled out for 364 runs in the first innings, at one stage they were 267 for 2 then lost the last 8 wickets for just 97 runs. Five wickets for James Anderson. #ENGvIND) 
 

Web Title: India vs England 2nd Test Live Cricket Score : India have been bowled out for 364, Five wickets for James Anderson 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.