India vs England 2021 2nd test match live cricket score : रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या टीम इंडियाच्या शिलेदारांनी इंग्लंडची पहिल्याच दिवशी जिरवली. रोहित शर्माच्या ८३ धावांनंतर लोकेश राहुलनं शतक झळकावताना टीम इंडियाला पहिल्या दिवशी दमदार मजल मारून दिली. लॉर्ड्सच्या हॉनर बोर्डावर नाव झळकावणारा तो भारताचा दहावा फलंदाज ठरला. ( His 6th Test century - His 3rd v England - 3rd Indian opener to score a Test 100 at Lord's - His first century in the World Test Championship)
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी संयमानं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड नसल्याचा आणि जेम्स अँडरसन पूर्णपणे तंदुरूस्त नसल्याचा फटका इंग्लंडला बसलेला पाहायला मिळाला. या दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण करताना १९५२मध्ये मंकड व रॉय यांचा १०६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. रोहित जेव्हा ११९ चेंडूंत ८१ धावांवर होता, तेव्हा लोकेशनं ९५ चेंडूंत १७ धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित १४५ चेंडूंत ८३ धावांपर्यंत येईपर्यंत लोकेशनं ११८ चेंडूंत ३३ धावा केल्या होत्या. रोहित १४५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून ८३ धावांवर माघारी परतला आणि रोहित-लोकेश यांची भागीदारी १२६ धावांवर संपुष्टात आली. जेम्स अँडसरसनच्या अप्रतिम चेंडूनं रोहितचा त्रिफळा उडवला अन् टीम इंडियाला मोठा धक्का बसला. चेतेश्वर पुजारा ( ९) पुन्हा अपयशी ठरला. त्यालाही अँडरसननं बाद केले. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live
त्यानंतर लोकेश व कर्णधार विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. विराटनं काही सुरेख फटके मारून फॉर्म परतल्याचे संकेत दिले. त्याचे कव्हर ड्राईव्ह फटक्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. लोकेशनं कसोटीतील ६ वे शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तो भारताचा दहावा फलंदाज ठरला. यापूर्वी दिलीप वेंगसरकर ( १०३, १५७ व १२६*), विनोद मंकड ( १८४ ), सौरव गांगुल ( १३१ ), मोहम्मद अझरुद्दीन ( १२१ ), गुंडप्पा विश्वनाथ (११३), अजित आगरकर ( १०९ ), राहुल द्रविड ( १०३ ), अजिंक्य रहाणे (१०३) आणि रवी शास्त्री ( १०० ) यांनी हा पराक्रम केला आहे.