Join us  

India vs England 2nd Test Live : पाऊस पडणार नाही असा अंदाज होता, पण तो आलाच; जाणून घ्या दुसरी कसोटी कधी सुरू होणार!

India vs England 2021 2nd test match live cricket score :  ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस पडणार नाही असा अंदाज व्यक्त केला गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 3:09 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score :  ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस पडणार नाही असा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण, लंडनमधील हवामान २४ तासांत बदलते याची प्रचीती आलीच. लॉर्ड कसोटीच्या पहिल्याच दिवशी नाणेफेक होण्यापूर्वीच पावसानं बॅटींग केली अन् सामना सुरू होण्यास विलंब झाला. आता ३.१५ किंवा ३.२० वाजता खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर नाणेफेकीचा निर्णय घेतला जाईल . ( Toss at 3.20 pm IST and play starts at 3.45 pm IST. ) 

पहिल्या सामन्यातील भारताची विजयाची संधी पावसाने हिरावल्यानंतर विराट सेना नव्या आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. मात्र, यावेळी भारताच्या फलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करावा लागेल. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात अजिंक्य रहाणेने लॉर्ड्सवर शतक झळकावण्याचा मान मिळवला होता. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने  संघाबाहेर गेला आहे. लॉर्ड्सवरील खेळपट्टी पाहूनही संघात बदल करण्यात आला आहे. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

लॉर्ड्स कसोटीवरही 'वरुण' राजाची अवकृपा?; जाणून घ्या दुसऱ्या कसोटीतील हवामानाचा अंदाज!

इंग्लंडचा  कर्णधार जो रुटचा अपवाद वगळता इतर कोणालाही भारतीय गोलंदाजांचा ठामपणे सामना करता आला नाही. युवा फलंदाजांनी इंग्लंडला अत्यंत निराश केले आहे. इंग्लंडसाठी आणखी चिंता म्हणजे वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची दुखापत. त्यामुळे यजमानांना दुसऱ्या सामन्यात त्याच्याविना खेळावे लागत आहे. आनंदाची गोष्ट अशी की जेम्स अँडरसन फिट असून तो खेळत आहे. बुधवारी त्याच्या सहभागाबाबतची अनिश्चितता होती. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, डोम बेस, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डोम सिबली आणि मार्क वुड.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडपाऊसबीसीसीआय
Open in App