Video : पत्रकारानं लॉर्ड्स कसोटीबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर रोहित शर्मानं ठोकला कडक सॅल्यूट!

India vs England 2nd Test Live : भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला लॉर्ड्स कसोटीत दमदार सुरूवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 04:38 PM2021-08-13T16:38:17+5:302021-08-13T16:38:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live : On possibility of winning 2nd Test on Independence Day - here's what Rohit Sharma said, Video  | Video : पत्रकारानं लॉर्ड्स कसोटीबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर रोहित शर्मानं ठोकला कडक सॅल्यूट!

Video : पत्रकारानं लॉर्ड्स कसोटीबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर रोहित शर्मानं ठोकला कडक सॅल्यूट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live : भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला लॉर्ड्स कसोटीत दमदार सुरूवात करून दिली. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सात चेंडूंत शतकवीर लोकेश व अजिंक्य रहाणे माघारी परतले. रवींद्र जडेजा व रिषभ पंत यांनी डाव सावरला असून टीम इंडियानं तीनशेपार मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत एक मजेशीर किस्सा घडला. पत्रकारानं लॉर्ड्स कसोटीबाबत व्यक्त केलेल्या संभाव्य निकालानंतर रोहित शर्मानं त्याला कडक सॅल्यूट ठोकला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सात चेंडूंत टीम इंडियाला दोन धक्के, निम्मा संघ तंबूत!

भारतानं पहिल्या दिवसात ३ बाद २७६ धावा केल्या होत्या. रोहितनं ८३ धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं शक्यता वर्तवली. तो म्हणाला, जर भारतीय संघाला १५ ऑगस्टला सामना जिंकण्याची संधी आहे आणि त्यासाठी चार दिवसांत लॉर्ड्स कसोटीचा निकाल लावावा लागेल. रोहित म्हणाला, सॅल्यूट सर. क्या बोला है आपने अगर ये हुआ तो बढिया हो जाएगा!''  

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: India vs England 2nd Test Live : On possibility of winning 2nd Test on Independence Day - here's what Rohit Sharma said, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.