Join us  

India vs England 2nd Test : जो रूट एकटा भिडला, टीम इंडियावर भारी पडला; लॉर्ड्सवर विक्रमांचा पाऊस पाडला!

India vs England 2021 2nd test match live cricket score : टीम इंडियाच्या दमदार कामगिरीला इंग्लंडकडून सडेतोड उत्तर मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:04 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : टीम इंडियाच्या दमदार कामगिरीला इंग्लंडकडून सडेतोड उत्तर मिळाले. लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस वगळला तर तीन दिवसांतील सर्वच सत्रांत यजमान इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) हा टीम इंडियासाठी 'खलनायक' ठरला. रूटनं सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावताना इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. लॉर्ड्सवर त्यानं चौथ्यांदा १७५+ धावा करण्याचा विक्रम करताना टीम इंडियावर एकटा भारी पडला. 

१६ फलंदाजांनी कसोटीत ९००० धावा केल्या, पण जो रूट त्यांच्यात 'उजवा' ठरला; पाहा भन्नाट स्टॅट्स लोकेश राहुलचे ( १२९) शतक अन् रोहित शर्माच्या ८३ धावांच्या जोरावर भारतीय संघानं पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. भारताचे ८ फलंदाज अवघ्या ९७ धावांत माघारी पाठवून इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केले. त्यानंतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना इंगा दाखवला. गोलंदाजांना पोषक नसलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्यानं धावा केल्या. डॉम सिब्ली ( ११) व हसीब हमीद ( ०) यांना मोहम्मद सिराजनं सलग दोन चेंडूंत बाद करून दुसऱ्या दिवशी धक्का दिला, परंतु रूटच्या मजबूत निर्धारासमोर टीम इंडिया अडखळली. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

टीम इंडियाची जर्सी घालून तो मैदानावर उतरला, फिल्डिंग करणार असा हट्टच धरला; पाहा Video 

३ बाद ११९ धावांवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा रूट व जॉनी बेअरस्टो जोडीनं सुरूवातीला संयमानं खेळ केला. खेळपट्टीची गोलंदाजांना मदत कमी मिळू लागल्यानंतर या दोघांनी हात सैल केले अन् धावांची गती वाढवली. रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो ५७ धावांवर माघारी परतला, सिराजच्या हलवा चेंडू त्याची विकेट घेऊन गेला. जोस बटलर २३ धावांकरून इशांत शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या मोईन अलीनं आक्रमक खेळ केला अन् चांगली फटकेबाजी मारली. दरम्यान, जो रूटनं कसोटी क्रिकेटमधील २२ वे, तर २०२१मधील पाचवे शतक झळकावले. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंच्या मेन्यू कार्डात 'तो' पदार्थ पाहून चाहते संतापले!

त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा पल्ला पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी अॅलिस्टर कूकनं हा पराक्रम केला आहे. लॉर्ड्सवरील रूटचे हे दुसरे कसोटी शतक आहे. यासह त्यानं लेन हटन व ग्रॅमी स्मिथ यांच्याशी बरोबरी केली. इंग्लंडकडून १६ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. अॅलिस्टर कूक १५७३७, केव्हीन पीटरसन १३७७९ आणि इयान बेल १३३३१ हे रूटनंतर सर्वाधिक धावा करणारे इंग्लंडचे फलंदाज आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक १० शतकं करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.  Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live

इंग्लंडच्या फॅन्सनी लोकेश राहुलवर फेकले वाईन बॉटल्सचे corks; विराट कोहली म्हणाला, उचल अन् मार त्यांना, Video

रूटने दीड शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून कसोटीतील त्याची ही सहावी १५०+ धावांची खेळी ठरली. त्यानं सहाव्या विकेटसाठी मोईन अलीसह ५८ धावा जोडल्या. इशांत शर्मानं एकाच षटकात मोईन अली ( २७) व सॅम कुरन ( ०) यांना बाद करून टीम इंडियाच्या ताफ्यात आशेचा किरण निर्माण केला. त्यानंतर सिराजनं या डावातील चौथी विकेट घेताना ऑली रॉबिन्सनला ( ६) बाद केले. मार्क वूडही ( ५) धावबाद झाला. रूट एका बाजूनं खिंड लढवत होता. त्याची जबरदस्त फटकेबाजी पाहून इंग्लंडचे फॅन्स भलतेच खूश झालेले होते. इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला. शमी दोन, इशांत शर्मा तीन आणि सिराजने चार विकेट्स घेतल्या. जो रूट ३२१ चेंडूंत १८ चौकारांसह १८० धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट
Open in App