India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या विक्रमी भागीदारीनंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. पण, त्यांना ती पेलवली नाही. लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी संयमानं इंग्लंडचा सामना करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी इंग्लंडला स्लेजिंगचा वापर करावा लागला, परंतु त्याचा फारसा फरक पडला नाही. जसप्रीत व शमीनं इंग्लंडच्या गोलंजादांची धुलाई केली. १० वर्षांपूर्वी राहुल द्रविड व अमित मिश्रा यांनी किंग्स्टन कसोटीत ९व्या विकेटसाठी जो पराक्रम केला तोच या जोडीनं आज करून दाखवला.
India vs England 2nd Test : शांत स्वभावाच्या जसप्रीत बुमराहचा पारा चढला, इंग्लंडकडून रडीचा डाव सुरू झाला
दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. या जोडीनं २९७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. पुजारानं २०६ चेंडूंत केवळ ४ चौकारांसह ४५ धावा , तर अजिंक्यनं १४६ चेंडूंत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या. रवींद्र जडेजा ( ३) धावांवर माघारी परतला. पाचव्या दिवशी रिषभने विकेट टाकली. तो २२ धावांवर माघारी परतला.
शमीनं खणखणीत षटकार खेचून कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.