Join us  

India vs England 2nd Test : टीम इंडियाची जर्सी घालून तो मैदानावर उतरला, फिल्डिंग करणार असा हट्टच धरला; पाहा Video 

India vs England 2021 2nd test match live cricket score : जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 6:53 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. बेअरस्टो आणि रूट यांनी १२१ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या धावफलकात महत्त्वाची भर घातली. बेअरस्टो माघारी परतल्यानंतर रूटनं शतक पूर्ण करून टीम इंडियासमोर अडचण निर्माण केली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचे लॉर्ड्सवर शतक, कसोटी क्रिकेटमधील २२ वे, तर २०२१मधील पाचवे शतक ठरले. लंच ब्रेकनंतर जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा मैदानावर एक मजेशीर प्रसंग घडला. जार्व्हो नावाचा व्यक्ती टीम इंडियाची जर्सी घालून मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी पोहोचला अन्...  India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला धक्के बसले, परंतु रूट खचला नाही आणि त्यानं दमदार खेळ केला. पण, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकमध्ये खेळाडूंसाठी ठेवलेल्या मेन्यूवरीन चाहते भडकलेले पाहायला मिळाले. रोरी बर्न्स-रूट यांनी १६४ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला, परंतु बर्न्स १३६ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर पायचीत झाला. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गोलंदाजांना फारशी मदत न मिळणाऱ्या खेळपट्टीवर रूट व बेअरस्टो सहजतेनं धावा करत होते. २०१६नंतर रूट व बेअरस्टो यांनी सहावेळा कसोटीत शतकी भागीदारी केली. रूटपाठोपाठ बेअरस्टोनंही अर्धशतक झळकावून इंग्लंडचा धावफलक हलता ठेवला. लंच ब्रेकनंतरही हो जोडी चांगला खेळ करत होती, परंतु मोहम्मद सिराजच्या उसळी घेणाऱ्या संथ चेंडूवर बेअरस्टोची एकाग्रता भंगली. विराटनं त्याचा सोपा झेल टिपला. बेअरस्टो ५७ धावांवर माघारी परतला अन् रूटसोबतची १२१ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट
Open in App