ठळक मुद्देभारतानं ८ बाद २९८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी ७० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६, तर जसप्रीत ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला.
India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या विक्रमी भागीदारीनंतर लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी ही जोडी चमकली. खरंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण टीम इंडियासाठी शेपूटच धावले. खणखणीत षटकार खेचून शमीनं कसोटीतील अर्धशतक पूर्ण केलं अन् लॉर्ड्सवर ९व्या विकेटसाठी सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. जस्सी व शमीची फटकेबाजी पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूट हतबल झालेला पाहायला मिळाला, दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लॉर्ड्सच्या बालकनीत बसून या फटकेबाजीची मनसोक्त आनंद लुटत होता.India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
जस्सी व शमी यांचं लक्ष विचलित करण्यासाठी इंग्लंडला स्लेजिंगचा वापर करावा लागला, परंतु त्याचा फारसा फरक पडला नाही. जसप्रीत व शमीनं इंग्लंडच्या गोलंजादांची धुलाई केली. १० वर्षांपूर्वी राहुल द्रविड व अमित मिश्रा यांनी किंग्स्टन कसोटीत ९व्या विकेटसाठी जो पराक्रम केला तोच या जोडीनं आज करून दाखवला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच टीम इंडियाचा डाव झटपट गुंडाळला जाईल, असाच अंदाज होता. पण, जसप्रीत व शमी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. त्यांची आत्मविश्वासपूर्णक फटकेबाजीपाहून लॉर्ड्सच्या बालकनीत बसलेला विराट कोहली भलताच खूश दिसला. नशीबानंही भारतीय जोडीला साथ दिली. १३ वर्षांनंतर SENA देशांमध्ये भारताकडून ९व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. यापूर्वी २००८मध्ये लक्ष्मण व आऱ पी सिंग यांनी हा पराक्रम केला होता. जसप्रीत व शमी यांच्या ७७* धावांच्या भागीदारीनं आणखी एक पराक्रम केला. भारताबाहेर ९व्या व १०व्या क्रमांकाच्या फलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. १९९१मध्ये किरण मोरे व वेंकट राजू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे ७७ धावांची भागीदारी केली होती. Ind vs End 2nd test match live
भारतानं ८ बाद २९८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी ७० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६, तर जसप्रीत ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला.
दुसऱ्या डावात टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. या जोडीनं २९७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. पुजारानं २०६ चेंडूंत केवळ ४ चौकारांसह ४५ धावा , तर अजिंक्यनं १४६ चेंडूंत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या. रवींद्र जडेजा ( ३) धावांवर माघारी परतला. पाचव्या दिवशी रिषभने विकेट टाकली. तो २२ धावांवर माघारी परतला.
Web Title: India vs England 2nd Test Live Score : India have declared at 298/8. England need 272 in 60 overs to win the Lord's Test.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.