India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या विक्रमी भागीदारीनंतर लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी ही जोडी चमकली. खरंतर रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण टीम इंडियासाठी शेपूटच धावले. खणखणीत षटकार खेचून शमीनं कसोटीतील अर्धशतक पूर्ण केलं अन् लॉर्ड्सवर ९व्या विकेटसाठी सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. जस्सी व शमीची फटकेबाजी पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूट हतबल झालेला पाहायला मिळाला, दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लॉर्ड्सच्या बालकनीत बसून या फटकेबाजीची मनसोक्त आनंद लुटत होता.India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
भन्नाट मीम्स: मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराहची फटकेबाजी, नेटिझन्सना आठवले युवी, द्रविड अन् लक्ष्मण!
या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. त्यांची आत्मविश्वासपूर्णक फटकेबाजीपाहून लॉर्ड्सच्या बालकनीत बसलेला विराट कोहली भलताच खूश दिसला. नशीबानंही भारतीय जोडीला साथ दिली. १३ वर्षांनंतर SENA देशांमध्ये भारताकडून ९व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. यापूर्वी २००८मध्ये लक्ष्मण व आऱ पी सिंग यांनी हा पराक्रम केला होता. जसप्रीत व शमी यांच्या ७७* धावांच्या भागीदारीनं आणखी एक पराक्रम केला. भारताबाहेर ९व्या व १०व्या क्रमांकाच्या फलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. १९९१मध्ये किरण मोरे व वेंकट राजू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे ७७ धावांची भागीदारी केली होती. Ind vs End 2nd test match live
भारतानं ८ बाद २९८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी ७० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६, तर जसप्रीत ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला.