India vs England 2021 2nd test match live cricket score : इंग्लंडचा कर्णधार जो रूट २०२१त सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज ठरला आहे. संघ संकटात असताना कर्णधारानं कसं खेळावं याची उत्तम प्रचिती रूट त्याच्या खेळीतून देत आहे. पहिल्या कसोटीत अर्धशतक व शतकी खेळीनंतर लॉर्ड्सवरही रूटचा फॉर्म कायम राहिलेला दिसला. भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला धक्के बसले, परंतु रूट खचला नाही आणि त्यानं दमदार खेळ केला. पण, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकमध्ये खेळाडूंसाठी ठेवलेल्या मेन्यूवरीन चाहते भडकलेले पाहायला मिळाले. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाच्या घोषणेची तारीख ठरली; जाणून घ्या १५ मध्ये कोणाची एन्ट्री
दुसऱ्या दिवशी प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली ( ११) व हसीब हमीद ( ०) यांना सिराजनं सलग दोन चेंडूंत माघारी पाठवले. मोहम्मद सिराजनं सलग दोन चेंडूवर धक्के दिले. रोरी बर्न्स व कर्णधार जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. दिवसाचा खेळ संपण्यास ११ षटकांचा खेळ शिल्लक करताना मोहम्मद शमीनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं बर्न्स-रूट यांची १६४ चेंडूंवरील ८५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. बर्न्स १३६ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर पायचीत झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं ३ बाद ११९ धावा केल्या होत्या. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गोलंदाजांना फारशी मदत न मिळणाऱ्या खेळपट्टीवर रूट व बेअरस्टो सहजतेनं धावा करत होते. २०१६नंतर रूट व बेअरस्टो यांनी सहावेळा कसोटीत शतकी भागीदारी केली. रूटपाठोपाठ बेअरस्टोनंही अर्धशतक झळकावून इंग्लंडचा धावफलक हलता ठेवला. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडनं ३ बाद २१६ धावा केल्या आहेत. रूट ८९ आणि बेअरस्टो ५१ धावांवर खेळत आहेत. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live
लंच ब्रेकमध्ये खेळाडूंच्या मेन्यूत Beef असल्यानं चाहते नाराज झालेत.