Join us  

India vs England 2nd Test : रोहित शर्मा इंग्लंडच्या जाळ्यात अडकला, सिक्सरसाठी विकेट गमावून बसला; Video

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 5:03 PM

Open in App

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर धावफलकावर २७ धावा असताना माघारी परतले आहेत. भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. पण, ही पिछाडी भरून काढण्यासाठी टीम इंडियाला दोन सलामावीरांची विकेट गमवावी लागली. इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड यानं या दोन्ही विकेट घेतल्या. रोहितला तर इंग्लंडनं जाळ्यात अडकवून विकेट फेकण्यास भाग पाडले... India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

टीम इंडियाच्या दमदार कामगिरीला इंग्लंडकडून सडेतोड उत्तर मिळाले. लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस वगळला तर तीन दिवसांतील सर्वच सत्रांत यजमान इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) हा टीम इंडियासाठी 'खलनायक' ठरला. रूटनं सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावताना इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. लॉर्ड्सवर त्यानं चौथ्यांदा १७५+ धावा करण्याचा विक्रम करताना टीम इंडियावर एकटा भारी पडला. इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला. शमी दोन, इशांत शर्मा तीन आणि सिराजने चार विकेट्स घेतल्या. जो रूट ३२१ चेंडूंत १८ चौकारांसह १८० धावांवर नाबाद राहिला. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. रोहित शर्मानं सुरेख कव्हर ड्राईव्ह, पूल फटके मारून आक्रमक सुरुवात केली. पण, मार्क वूडनं भारताला धक्के दिले. लोकेश राहुल ३० चेंडूंत ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर १२व्या षटकात रोहितसाठी इंग्लंडनं जाळं वेचलं... मार्क वूडनं टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर रोहितनं पूल शॉट मारून षटकार खेचला. त्यानंतर वूडनं आणखी एक बाऊन्सर टाकला. त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितला पूल शॉट मारण्यास भाग पाडले. रोहितला बाद करण्यासाठी तीन खेळाडू डाव्या सीमारेषेवर उभे केले होते अन् मोईन अलीनं झेल घेत रोहितला बाद केले... Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live

पाहा व्हिडीओ.. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मालोकेश राहुल
Open in App