Join us  

India vs England 2nd Test : लोकेश राहुलला Man Of The Match दिला म्हणून वीरू नाराज; म्हणाला, मी या खेळाडूला दिला असता!

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:58 PM

Open in App

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं चौथ्या दिवशी विक्रमी १०० धावांची भागिदारी करून विजयाचा पाया रचला पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना नाबाद ८९ धावांची भागीदारी केली.  

विराट कोहलीनं ग्रेट क्लाईव्ह लॉईड यांचा विक्रम मोडला, लॉर्ड्सवर बाजी मारणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला!

भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या १२९, रोहित शर्माच्या ८३, विराट कोहलीच्या ४२, रवींद्र जडेजाच्या ४० व रिषभ पंतच्या ३८ धावांच्या जोरावर ३६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं जो रूटच्या नाबाद १८०, जॉनी बेअरस्टो ५७ आणि रोरी बर्न्स ४९ यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ३९१ धावा करून २७ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराजनं ४, इशांत शर्मानं ३ आणि मोहम्मद शमीनं २ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे ( ६१) व चेतेश्वर पुजारा ( ४५) यांनी विक्रमी १०० धावांची भागीदारी करून टीम इंडियाला सावरले. त्यानंतर पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह ( ३४*) व मोहम्मद शमी ( ५६*) यांनी नाबाद ८९ धावांची भागीदारी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. भारतानं ८ बाद २९८ धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. जो रूटनं ३३ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं पुन्हा ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं या सामन्यात १२६ धावा देताना ८ विकेट्स घेतल्या. त्यानं कपिल देव यांचा ८ बाद १६८ धावांचा विक्रम मोडला. आर पी सिंगनं ११७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीतनं तीन, इशांत शर्मानं दोन आणि शमीनं एक विकेट घेतली. पण, सामन्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार लोकेश राहुलला देण्यात आला. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score, 

सोनी टेनच्या एक्स्ट्रा इनिंगवर बोलताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला लोकेशला MOM देणं पटलं नाही. तो म्हणाला,''लोकेशनं शतक झळकावून चांगला बेस तयार केला, पण हा पुरस्कार गोलंदाजांना मिळायला हवा होता. मोहम्मद शमीनं गोलंदाजी व फलंदाजीत योगदान दिले आणि मी त्यालाच मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिला असता.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविरेंद्र सेहवागलोकेश राहुल
Open in App