India vs England 2nd Test Live: ...म्हणून विकेट मिळाल्यानंतर तोंडावर ठेवतो बोट, सिराजने उघड केलं गुपित

Mohammed Siraj News: विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट ठेवून सेलिब्रेशन करण्याची स्टाईल क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत आहे. आता मोहम्मद सिराजने सेलिब्रेशन करताना तोंडावर बोट ठेवण्यामागचं गुपित उघड केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:43 PM2021-08-15T12:43:57+5:302021-08-15T12:45:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live: ... So after getting the wicket, he puts his finger in his mouth, Siraj revealed the secret | India vs England 2nd Test Live: ...म्हणून विकेट मिळाल्यानंतर तोंडावर ठेवतो बोट, सिराजने उघड केलं गुपित

India vs England 2nd Test Live: ...म्हणून विकेट मिळाल्यानंतर तोंडावर ठेवतो बोट, सिराजने उघड केलं गुपित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सिराजने काल इंग्लंडच्या पहिल्या डावात चार विकेट्स टिपल्या. (Mohammed Siraj) दरम्यान, विकेट घेतल्यानंतर तोंडावर बोट ठेवून सेलिब्रेशन करण्याची स्टाईल क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरत आहे. आता मोहम्मद सिराजने सेलिब्रेशन करताना तोंडावर बोट ठेवण्यामागचं गुपित उघड केलं आहे. (... So after getting the wicket, he puts his finger in his mouth, Siraj revealed the secret)

विकेट मिळवल्यावर तोंडावर बोट  ठेवून सेलिब्रेशन करण्यामागचे कारण स्पष्ट करताना मोहम्मद सिराज म्हणाला की, ही कृती मी माझ्याबाबतीत खूप काही बोलणाऱ्या टीकाकारांना उद्देशून करतो. मी हे करू शकत नाही. मी ते करू शकत नाही, असं म्हणणाऱ्यांना माझा चेंडू उत्तर देईल. सेलिब्रेशन करण्याचा माझा हा अंदाज आहे.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी लोकेश राहुलवर बाटल्यांची झाकणे फेकली होती. त्याबाबत सिराज म्हणाला की या प्रकाराबाबत मला माहिती नाही. काय घडले हे मी पाहिले नाही. मात्र प्रेक्षकांनी कुठलाही अपशब्द उच्चारला नाही.

मी सातत्याने चांगली गोलंदाजी करण्यावर भर देत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये खेळतानाही माझे हेच लक्ष्य असे. मात्र खेळताना मी जास्त प्रयोग करण्याची रणनीती वापरत नाही, असेही सिराज म्हणाला. 
दरम्यान, कर्णधार जो रूटने केलेली  शानदार शतकी खेळी आणि जॉनी बेअरस्टो याच्यासोबत १२१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला ३९१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या खेळीच्या जोरावर इंग्लंडला २७ धावांची आघाडी मिळाली.

Web Title: India vs England 2nd Test Live: ... So after getting the wicket, he puts his finger in his mouth, Siraj revealed the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.