Join us  

२ धावांत २ विकेट्स! ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आधी रोहितचा त्रिफळा उडवला अन् नंतर यशस्वीला... 

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने ( James Anderson ) भारताच्या दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 10:09 AM

Open in App

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) :  भारत-इंग्लंड दुसरी कसोटी पहिल्या दोन दिवस यशस्वी जैस्वालचे द्विशतक अन् जसप्रीत बुमराहच्या सहा विकेट्समुळे गाजली. पण, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने ( James Anderson ) भारताच्या दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवले. कर्णधार रोहित शर्मा अँडरसनच्या अन प्लेअबल चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अँडरसनने पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वालला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. 

'या' एका गोष्टीमुळे जसप्रीत बुमराह ठरला कसोटीमधील १०० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज 

पहिल्या डावात भारताचे अन्य फलंदाज अडखळत असताना यशस्वी मैदानावर उभा राहिला आणि २०९ धावांची विक्रमी खेळी करून भारताला ३९६ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर जसप्रीतने इंग्लंडच्या फलंदाजांना गुंडाळले. ऑली पोप व बेन स्टोक्स यांचे जसप्रीतने उडवलेले त्रिफळे सर्वांना अवाक् करणारे होते. इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गुंडाळून भारताने पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून झॅक क्रॉली ( ७६) आणि बेन स्टोक्स ( ४७)  हे चांगले खेळले. बुमराहने ४५ धावांत ६ विकेट्स घेतल्या.  

भारत दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करून मजबूत लक्ष्य ठेवेल अशी आशा होती आणि रोहित शर्मा व यशस्वी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, रोहित पुन्हा अपयशी ठरला. अँडरसनच्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडाला. त्यानंतर पुढील षटकात अँडरसनने यशस्वीला झेल देण्यास भाग पाडून भारताचे दोन्ही सलामीवीर ३० धावांवर माघारी पाठवले. कालच्या बिनबाद २८ धावांवरून भारताची अवस्था २ बाद ३० अशी झाली. फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलला आज नशिबाची साथ मिळताना दिसली. पायचीत अपीलवर अम्पायरने त्याला बाद दिले होते, परंतु तिसऱ्या अम्पायरने तो निर्णय बदलला. त्यानंतर अँडरसनच्या गोलंदाजीवर पायचीत अपील झाले आणि यावेळी मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले. रिप्लेत चेंडू स्टम्प उडवताना दिसला, परंतु तिसऱ्या अम्पायरने अम्पायर्स कॉल ठेवल्याने गिल वाचला. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मायशस्वी जैस्वालजेम्स अँडरसन